शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

होणार का ‘सर्जिकल स्ट्राइक’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:18 IST

लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पटलावर शांत झालेली अमरावती अचानक पुन्हा ढवळून निघाली. एका आॅडिओ क्लिपने हे सारे घडले. ती क्लिप लीक झालेली असो वा कुणी लीक केलेली - त्यातून आता निर्माण झालेला चक्रव्यूह ध्वनिफितीतील पात्रांना किती आत ओढतो ......

अमरावती : लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पटलावर शांत झालेली अमरावती अचानक पुन्हा ढवळून निघाली. एका आॅडिओ क्लिपने हे सारे घडले. ती क्लिप लीक झालेली असो वा कुणी लीक केलेली - त्यातून आता निर्माण झालेला चक्रव्यूह ध्वनिफितीतील पात्रांना किती आत ओढतो आणि ओढले जाणाऱ्यांना तो कितपत भेदता येतो, याचा रंजक संघर्ष येणाऱ्या काही दिवसांमध्ये अमरावतीकरांना बघता येणार आहे.आॅडिओ क्लिपची चर्चा सामान्यजनांत आणि राजकारण्यांमध्ये उत्सुकतेने होण्याची कारणे दोन- त्यातील आवाजातून एकमेकांविरुद्ध दंड थोपटणाऱ्या भाजप आणि काँग्रेस पक्षांमधील मैत्रीचे बंध जाहीर होणे आणि दुसरे- दोन्ही पक्षांच्या निर्णायक नेत्यांनी या मुद्याची अंतर्गत पातळीवर दखल घेणे.वादळी चर्चा होत असलेल्या आॅडिओ क्लिपच्या राजकीय प्रयोगात बुधवारी सायंकाळी अनपेक्षित वळणबिंदू आला. सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी तो आवाज माझाच असल्याची कबुली स्वत:हून दिली नि ध्वनिफितीच्या खरेपणाविषयी एका बाजूने शिक्कामोर्तब झाले.दुसरा आवाज अमरावती शहराचे आमदार राहिलेल्या रावसाहेब शेखावत यांच्या आवाजासम आहे. तो आवाज रावसाहेब शेखावत यांचा नाही, असे स्पष्टीकरण पहिल्यांदा भाजपच्या दिनेश सूर्यवंशी यांनी दिले. त्यानंतर चर्चेतील सहभागाचा इन्कार करणारे प्रसिद्धी पत्रक रावसाहेबांकडून आले.अनुभवाप्रमाणे, सहसा पत्रपरिषदेत स्वत:बाबत बोलले जाते. सूर्यवंशी यांची पत्रपरिषद जितकी स्वत:ला फोकस करणारी होती, तितकीच ती रावसाहेबांचा बचाव करणारीही होती. विरोधातूनही मैत्रीचा सुगंध दरवळला, अशी टीका राजकीय विश्लेषकांना करता यावी, असा तो प्रसंग ठरला.जनतेचा अपमान की बौद्धिक असामर्थ्य?बोलणारा मीच, आवाजही माझाच, साल २०१७ - इतके मुद्दे ठळकपणे सांगणाºया दिनेश सूर्यवंशी यांना मात्र चर्चा कुणासोबत झाली, हे आठवत नव्हते. सत्ताधारी पक्षाच्या ग्रामीण जिल्हाप्रमुखांचा हा दावा सामान्यजनांना निर्बुद्ध समजणारा तरी आहे किंवा सूर्यवंशींचे बौद्धिक असामर्थ्य तरी दर्शविणारा आहे.स्वत: निवडणूक लढण्यासाठीच्या तयारीचे मुद्दे आणि पाच कोटी रुपयांच्या बजेटची मांडणी अशी महत्त्वपूर्ण चर्चा आपण कुणाशी केली, हे सूर्यवंशी विसरत असतील, ताण देऊनही त्यांना ते आठवत नसेल, तर पक्षाने भविष्यात खरेच आमदारकीसाठीचे तिकीट त्यांना द्यावे काय?राजकारणातील पुरुषसत्ताकपणाध्वनिफितीच्या चर्चेतील एक मुद्दा विचारशील मंडळींनी दखल घ्यावा असा आहे. तो मुद्दा होय - राजकारणातील पुरुषसत्ताकपणा!महिलांचा सन्मान करणारी अमरावतीची भूषणावह परंपरा विदर्भकन्या देवी रुक्मिणीपासून तर देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींपर्यंत चालत आली असताना, एका महिला नेत्याला पराभूत करण्यासाठी दोन पुरुष नेत्यांनी योजलेली रणनीती, चर्चेदरम्यान वापरलेली भाषा आणि भाषाशैलीतून व्यक्त होत असलेला भाव हे सारेच स्त्रियांना 'हीन' लेखणारे आहे.वरिष्ठ पातळीवर दखलव्हायरल ध्वनिफितीची चर्चा दोन्ही पक्षांमध्ये मुंबई आणि दिल्ली पातळीपर्यंत पोहोचली आहे. दोन्ही पक्षांनी प्रसिद्धी माध्यमांची कात्रणे गुरुवारी सकाळीच मागवून घेतली. काही नेत्यांना त्रयस्थपणे चौकशी करण्याचे निर्देशही प्राप्त झाले आहेत. घटनेवर दोन्ही पक्षांचा शांतपणे ‘वॉच’ आहे.आगामी काळ निवडणुकांचा असल्यामुळे सामान्यजनांच्या मनात निर्माण होणाºया भावना पक्षप्रतिमेला मारक ठरू नये, हा मुद्दा पक्षाच्या लेखी महत्त्वाचा. त्यामुळे इतर कुणावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा इरादा ठेवून जरी क्लिप व्हायरल केली गेली असेल तरी आता क्लिपचीच 'सर्जरी' आणि गरज भासल्यास त्यातील सहभागी व्यक्तींवर 'सर्जिकल स्ट्राईक' होण्याची शक्यता नाकारता येत नाही.