मेळघाट प्रकल्पाच्या सीमा रुंदावणार
By Admin | Updated: January 10, 2017 04:12 IST2017-01-10T04:12:05+5:302017-01-10T04:12:05+5:30
मेळघाटात वाघांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यांचे संंरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबाहेरील बफरक्षेत्र

मेळघाट प्रकल्पाच्या सीमा रुंदावणार
गणेश वासनिक / अमरावती
मेळघाटात वाघांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यांचे संंरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबाहेरील बफरक्षेत्र (कोअर) जंगल ताब्यात घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाकडे पाठवला आहे. प्रादेशिक वनविभागाच्या सुमारे ७०० किमी जंगलाचा यात समावेश असेल.
वाढत्या संख्येमुळे वाघांना मुक्त संचार करण्यास जंगलाचे क्षेत्र अपुरे पडत आहे. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांच्या संचालकांनी प्रादेशिक वनविभागाचे जंगल पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाकडे पाठविण्यात आला आहे. सध्या मेळघाटात ४५ वाघ असून त्यापैकी ८ ते १० छावे असल्याचा अंदाज व्याघ्र प्रकल्पांच्या कर्मचाऱ्यांनी वर्तविला आहे.