आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ; तीन हजार ऑनलाईन अर्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST2021-07-28T04:13:21+5:302021-07-28T04:13:21+5:30
प्रवेशप्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक नाही: दहावीनंतर विद्यार्थ्यांचा वाढता कल जितेंद्र दखने अमरावती - काही वर्षांपूर्वी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओस ...

आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ; तीन हजार ऑनलाईन अर्ज !
प्रवेशप्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक नाही: दहावीनंतर विद्यार्थ्यांचा वाढता कल
जितेंद्र दखने
अमरावती - काही वर्षांपूर्वी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओस पडल्या होत्या. आता आयटीआय अर्थात तंत्र शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. औद्योगिक क्षेत्रात कुशल कामगारांची मागणी वाढल्यामुळे युवक-युवती आयटीआयकडे वळत आहेत.
जिल्ह्यात आयटीआयच्या शासकीय व खासगी मिळून ६ हजार ४९६ जागा आहेत. अद्याप आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया अधिकृत सुरुवात झाली नसतानाही ३ हजार १३४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. गत काही वर्षांपासून आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे आदी ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्रात आयटीआय युवकांना मोठी मागणी आहे. तशा संधीसुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत विविध खासगी कंपन्या आयटीआय विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये संधी घेत आहेत. रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे विद्यार्थी आयटीआयला अधिक पसंती देत आहेत. जिल्ह्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था १८ व खासगी संस्था १३ आहेत. या संस्थांमध्ये विविध शाखांच्या एकूण ६ हजार ४९६ जागा उपलब्ध आहेत. अद्याप अधिकृत प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायची आहे. तंत्रशिक्षण विभागाकडून प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यावर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती तरी पटीने वाढण्याची शक्यता आहे.
बॉक्स
विविध ट्रेडना पसंती !
१)औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध प्रकारचे कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये सर्वाधिक मागणी इलेक्ट्रिशियन, डिझेल मॅकेनिकल आणि फिटर ट्रेडला आहे.
२) दरवर्षी इलेक्ट्रिशियन शाखेसाठी सर्वाधिक विद्यार्थी प्रवेश अर्ज करतात. या शाखेसाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा दिसून येते.याशिवाय डिझेल मॅकेनिकल ट्रेडही अधिक पसंती असून, त्याद्वारे रेल्वेमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. प्रत्येकाला या शाखेत प्रवेश हवा असतो.
३) औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये विविध कंपन्यांमध्ये फिटर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची अधिक मागणी असते. फिटर ट्रेडमुळे केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य त्यांच्या अंगी असतात.
कोट
विद्यार्थी म्हणतात
भविष्याच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आयटीआय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे. इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी किंवा स्वयंरोजगार करता येऊ शकतो.
- कांचन उके, विद्यार्थिनी
कोट
इतर ठिकाणी नोकरीच्या संधी शिक्षण घेतल्यानंतर उपलब्ध होत नाहीत. मात्र, आयटीआयमध्ये प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे आयटीआयला प्रवेश घेण्याची तयारी केली आहे.
- ऋषभ फरकुंडे, विद्यार्थी
बॉक्स
अर्ज स्थिती - ३१३४
एकूण जागा - ६४९६
आलेले अर्ज - ३१३४
संस्था ३१
शासकीय संस्था -१८
खाजगी संस्था-१३
रिक्त जागा -६४९६
शासकीय जागा-४९८०
खाजगी जागा-१५१६