‘त्या’ दाम्पत्यावर होणार फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 00:40 IST2016-02-19T00:40:36+5:302016-02-19T00:40:36+5:30

आई मरण पावली असताना पैशांच्या लालसेपोटी तिला जीवंत दाखवून तिच्या सेवानिवृत्तीचे चार लाख रुपये सफाई

'That' will happen to the criminal | ‘त्या’ दाम्पत्यावर होणार फौजदारी

‘त्या’ दाम्पत्यावर होणार फौजदारी

अमरावती : आई मरण पावली असताना पैशांच्या लालसेपोटी तिला जीवंत दाखवून तिच्या सेवानिवृत्तीचे चार लाख रुपये सफाई कर्मचारी पती-पत्नीने उचल केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई केली जाणार आहे. महापालिका सामान्य प्रशासन विभागाने फौजदारी कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला आहे.
लक्ष्मी प्रेम ढेंढवाल या महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा मृत्यू १३ एप्रिल २०१३ रोजी झाला असताना त्यांचे सुपूत्र गणेश व सून छाया ढेंढवाल यांनी त्यांना जीवंत असल्याचे भासवून सेवानिवृत्तीच्या रक्कमेची उचल केली. लक्ष्मी यांना त्यांचय पतीकडून मिळणारी सेवानिवृत्तीची रक्कम देखील उचलण्याचा प्रताप झाला. हा प्रकार लेखा विभागात पडताळणीच्या वेळी उघडकीस आला. गणेश व छाया ढेंढवाल आरोग्य विभागाचे कर्मचारी असल्यामुळे फौजदारीची तक्रार आरोग्य विभागाने करावी, असे प्रशासनाला अपेक्षित आहे. लक्ष्मी ढेंढवाल जीवंत असल्याचे प्रमाणपत्र डॉ. जी.एस.जोशी यांनी ३०० रुपयांत दिल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: 'That' will happen to the criminal