बॅलन्स उडून जाईल? चक्क उडालेच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:31 IST2021-01-13T04:31:14+5:302021-01-13T04:31:14+5:30
पान २ साठी लिड बातमी अमरावती/नांदगाव खंडेश्वर : ‘दोन दिवसांपासून मेसेज केलाय, तुमच्याकडून त्याबद्दल उत्तर आलेले नाही. उत्तर न ...

बॅलन्स उडून जाईल? चक्क उडालेच !
पान २ साठी लिड बातमी
अमरावती/नांदगाव खंडेश्वर : ‘दोन दिवसांपासून मेसेज केलाय, तुमच्याकडून त्याबद्दल उत्तर आलेले नाही. उत्तर न दिल्यास खात्यातील बॅलन्स उडून जाईल,’ या अनामिकाकडून आलेल्या इशाऱ्याला बळी पडून बँक ग्राहक तरुणीने प्रक्रिया करताच खात्यातून ३७ हजार ५०४ रुपये परस्पर काढण्यात आले. नांदगाव खंडेश्वर येथे ८ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास ही आर्थिक फसवणूक झाली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ४२० व आयटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल केला आहे.
नांदगाव खंडेश्वर येथील २४ वर्षीय तरुणीच्या मोबाईलवर ८२०८१४४९१२ या क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. त्यानुसार, त्या तरुणीने मोबाईलद्वारे बँक खात्यासंबंधी ऑनलाईन प्रक्रिया केली. त्या प्रक्रियेदरम्यान खात्यातून १९९९ रुपये, ३४ हजार ५५५ रुपये व ९५० असे एकूण ३७ हजार ५०४ रुपये डेबिट (कमी) झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने नांदगाव खंडेश्वर पोलिसांत धाव घेतली. अलीकडच्या काही घटनांवर नजर टाकल्यास सायबर चाच्यांनी ग्रामीण भागातील लोकांना लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे.
बॉक्स १
ओटीपी चोरून बँक अकाऊंटमधून अशी होते फसवणूक
ऑनलाईन बँकिंग फ्रॉडची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. म्हणूनच ऑनलाइन शॉपिंग करताना आपल्याला अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे. ओटीपी म्हणजे वन टाइम पासवर्ड सिस्टीमला सर्वात सुरक्षित पद्धत मानली जाते, परंतु, प्रत्यक्षात तसे नाही. अलीकडे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात फसव्या लोकांनी बँक ग्राहकांकडून चतुराईने ओटीपी मागितला गेला किंवा थेट त्यांचे स्मार्टफोन हॅक करून ओटीपी चोरण्यात आला.
बॉक्स२
नवी शक्कल
आता चोरांना ओटीपी मिळविण्यासाठी एक नवीन मार्ग सापडला आहे. ते बँकेत दाखल होतात आणि खातेदार असल्याचे सांगून नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलतात. एकदा हा क्रमांक बदलला की, त्यांच्या मोबाईलवर ओटीपी येतो आणि त्यानंतर काही सेकंदात खाते रिक्त होते. ओटीपी फसवणूकीसाठी बँकांमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलण्याचा ट्रेंड वाढत आहे. फसवणूक करण्याची दुसरी पद्धत म्हणजे ते मोबाईल ऑपरेटरकडून डुप्लिकेट आयडी प्रूफ गोळा करतात आणि त्याद्वारे डुप्लिकेट सिम घेतात. मोबाईल ऑपरेटर नवीन सिम जारी होताच जुने सिम निष्क्रिय करतो. अशाप्रकारे, गुन्हेगार पुन्हा डुप्लिकेट सिमवर ओटीपीची मागणी करतात आणि खात्यातून पैसे काढतात.
बॉक्स ३
फसवणुकीपासून वाचण्यासाठी या गोष्टी नक्की करा.
नवीन सुरक्षा यंत्रणांचा वापर करा.
आपला पासवर्ड वारंवार बदलत राहा.
बँकेला आपली नवीन माहिती द्या.
सुरक्षित नेटवर्कवरूनच बँक खाते ऑपरेट करा.