शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

धावपट्टीवर वन्यप्राणी; अमरावतीमधील बेलोरा विमानतळावर विमाने उडणार कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 00:08 IST

विमानतळाचा २०० एकर परिसरातून बाहेर काढण्याची कसरत : अपघाताची भीती

मनीष तसरे

अमरावती : बडनेरानजीक बेलोरा विमानतळाचे लवकरच विस्तारीकरण होणार असून, सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीची लांबी १३०० मीटरवरून १८०० मीटर केली जाणार आहे. जवळपास २०० एकरात विस्तारलेले हे विमानतळ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पूर्ण क्षमतेने सुरू होईल. या ठिकाणी एटीआर स्वरूपाची ७२ आसनी विमाने उतरणार आहेत. एवढेच नव्हे तर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सोयदेखील होणार आहे. दुसरीकडे या विस्तीर्ण परिसरात असलेल्या शेकडो वन्यप्राण्यांनी डोकेदुखी वाढविली आहे. त्यांना बाहेर न काढल्यास भविष्यात ते केव्हाही धावपट्टीवर येऊन अपघात घडवू शकतात, ही शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्राण्यांना बाहेर काढण्यासाठी वनविभागाला पत्रव्यवहार केला आहे.

बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच पूर्ण होऊन या ठिकाणाहून विमानसेवा सुरू होईल. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो वन्यप्राण्यांचा मुक्काम या ठिकाणी आहे. भूसंपादन केलेल्या जमिनीवर मुबलक चारा, पाणी असल्याने त्यांचा या ठिकाणी ठिय्या आहे. या पूर्ण परिसराला संरक्षण भिंत उभारल्याने या परिसरातून प्राणी बाहेर पडू शकत नाहीत.---------------------------------------

वन्यप्राण्यांना बाहेर काढणे कठीणजवळपास २०० एकर परिसरात हरिण, नीलगाय, रानडुक्कर, मोर यांसारखे शेकडो प्राणी परिसरात आहेत. या सर्व प्राण्यांना बाहेर काढणे हे वनविभागासमोर आव्हान आहे. शिकारी प्राणी नसल्याने या ठिकाणी असलेल्या प्राण्यांची संख्याही वाढतच आहे. याआधी एवढ्या मोठ्या संख्येने रेस्क्यू करण्याची वनविभागाला वेळच आली नाही. त्यामुळे नेमकी कुठली पद्धत वापरावी, याबाबत अजून वनविभागाने निर्णय घेतला नाही.

बेलोरा विमानतळावरील धावपट्टीवर वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या अपघाताची शक्यता पाहता, त्यांना बाहेर काढण्यासंबंधी पत्र आमच्या कार्यालयाला प्राप्त झाले असेल. माझ्याकडे नव्याने चार्ज आला आहे. ते पत्र मिळवून आम्ही त्यावर लवकरच निर्णय घेऊ.

- दिव्या भारती, उपवनसंरक्षक, वनविभाग

टॅग्स :AmravatiअमरावतीAirportविमानतळairplaneविमान