प्रदुषणमुक्तीसाठी वन्यप्रेंमीचा पुढाकार, महापालिका निद्रीस्तच
By Admin | Updated: October 23, 2016 00:31 IST2016-10-23T00:31:52+5:302016-10-23T00:31:52+5:30
छत्री तलाव प्लॅस्टिकमय झाल्याने स्थंलातरित पक्ष्यांसह स्थानिक पक्षी प्रजातीला धोका निर्माण झाला आहे.

प्रदुषणमुक्तीसाठी वन्यप्रेंमीचा पुढाकार, महापालिका निद्रीस्तच
छत्री तलाव प्लॅस्टिकमय : ट्रक भरून प्लॅस्टिक कचरा गोळा
अमरावती : छत्री तलाव प्लॅस्टिकमय झाल्याने स्थंलातरित पक्ष्यांसह स्थानिक पक्षी प्रजातीला धोका निर्माण झाला आहे. याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आता तलाव स्वच्छ करण्याकरिता वन्यप्रेमींनीच पुढाकार घेतला आहे. शनिवारी शंभरावर वन्यप्रेमींनी प्लॅस्टिक ट्रकभर कचरा काढून स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.
वाढते शहरीकरण हे समृध्द जंगलासाठी संकट निर्माण करीत आहे. त्यातच नागरिक जलस्त्रोत प्रदूूषित करीत आहेत. देवी-देवतांच्या मूर्ती शिरविताना निर्माल्यासह प्लास्टिक कचरा तलावात फेकतात. प्लॅस्टिकच्या वाट्यासह अनेक वस्तु छत्री तलावात फेकण्यात आल्याने पाणी प्रदुषित झाले आहे. त्यामुळे वन्यप्राणी व पक्षांसाठी हे मोठे संकट निर्माण झाले आहे. तलाव स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, प्रशासनाची ही निगरगट्ट भूमिका वन्यप्राण्यांच्या जीवावर बेतणारी आहे. छत्री तलाव प्लॅस्टिकमय झाल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच वन्यप्रेमींनी पुढाकार घेऊन शनिवारी सकाळी छत्री तलाव स्वच्छता अभियान राबविले. वन्यप्रेमी व पक्षी अभ्यासक यादव तरटे, मनोज बिंड, वैभव दलाल, शुभम सायंके, रोहन गुप्तासह एनएसएसच्या शभंरावर विद्यार्थ्यांनी तलावातील प्लॅस्टिक बाहेर काढून ट्रकभर कचरा गोळा केला आहे. यावेळी वनविभागाचे उपवनसरंक्षक हेमंतकुमार मिना यांच्यासह वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.व्ही. पडगव्हाणकर यांची उपस्थिती होती. तलावातील कचऱ्यासंदर्भात उपवनसरंक्षक मीना यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा केलीे. त्यावर काही उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले. (प्रतिनिधी)