शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 18:56 IST

पीक नुकसानीमुळे हवालदिल : मदतीला विलंब, लालफितशाहीत अडकल्या फाईली

- गणेश वासनिकअमरावती : विदर्भात हरीण, नीलगाय, सांबर, चितळ व रानडुकरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, जंगलात हिरवळ, चारा, पाणी नसल्याने या वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये वळविला आहे. हे वन्यप्राणी शेती पिके बेसुमारपणे नष्ट करतात. मात्र,  शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई थातुरमातुर  मिळत आहे.

 अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा व नागपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी दोन वर्षांपासून आपला मोर्चा शेतीकडे वळविला आहे. कळपाने वास्तव्य करणाºया या वन्यप्राण्यांनी शेतीतील गहू, हरभरा, कपाशी, तूर व सोयाबीन या पिकांवर हल्ला केलेला आहे. विदर्भातजंगलातील गवत, चारा नष्टप्राय झालेले असून तृष्णा भागविण्यासाठी पाण्याची बिकट अवस्था आहे. परिणामी वन्यजीव जंगलाशेजारच्या शेतीत घुसून पिकांची धुळधान करीत असल्याचे वास्तव आहे. वन्यप्राण्यांच्या या संकटामुळे विदर्भातील शेतकरी पुरता हैराण झालेला आहे. सतत चार वर्षांपासून सतत नापिकी आणि यंदा दुष्काळ स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच वन्यप्राण्यांच्या हैदासाने यात भर पडली आहे. शेतातील उभे पिक वन्यप्राणी नष्ट करीत असल्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास विदर्भात शेतकºयांच्या विंवचनेत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

कुंपनाला वीजप्रवाहवन्यप्राण्यांपासून शेतीतील पिकांचे नुकसान रोखण्याकरिता शेतकरी शेतीच्या कुंपनाला रात्रीच्या सुमारास वीज प्रवाह सोडतात. परिणामी यात वन्यजीवांचा जीव जातो तर शेतकºयास तुरुंगवारी होते. दोन वर्षांत वीज प्रवाहामुळे ३ वाघ, ५ बिबट व इतर वन्यजीवांना प्राण गमवावा लागला. उंच कुंपण ओलांडून वन्यप्राणी शेतात शिरतात अन् पिके फस्त करतात. 

पीक नुकसानीची मदत अपुरीरात्रीतून वन्यजीव कमी अधिक प्रमाणात ५ ते ७ हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी करतात. अशावेळी प्रसिद्ध समिती शेतकºयांच्या शेती पीकनुकसानीचा अहवाल तयार करतात. मात्र, शेतकºयांना शेत पीक नुकसानीच्या केवळ ४० टक्के मदत वनविभाग देते. ही मदत एक वर्षानंतर शेतकºयांना मिळत असल्याने शेतकºयांमध्ये रोष निर्माण झाला आहे. हेक्टर होणाºया नुकसानीच्या तुलनेत टप्पा-टप्प्याच्या नुकसानीचे गणित काढून शेतकºयास प्रतिएकर ५ ते ७ हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. परंतु, त्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागते.

निधीचा अभाव शेती पीक नुकसानीचे विदर्भात १० हजारांच्यावर प्रकरणे वनविभागाकडे आलेली असून निधीचा वानवा असल्याने शेतकºयांना गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक मदत देण्यात आली नाही. शेत पिक नुकसानीचे प्रकरणे वाढीस लागलेली असताना निधी मिळत नसल्याने शेतकरी संकटात आलेला आहे. परिणामी विदर्भातील वन्यजीवसुद्धा धोक्यात आलेले आहे. कारण निलगायी, हरिण, चितळ, चिंगारा, रानडुक्कर या वन्यप्राण्यांची संख्या जंगल नसलेल्या भागात दुपटीने वाढ झालेली आहे. 

 

वन्यप्राण्यांनी शेती पिकाचे नुकसान केल्यास त्याची नुकसान भरपाईसाठी नियमावली ठरली आहे. त्यानुसारच वनविभाग कार्यवाही करते. नुकसान भरपाईची काही प्रकरणे प्रलंबित असतील तर त्याचा मागोवा घेत संबंधित शेतकºयांना न्याय दिला जाईल.  - गजेंद्र नरवणे,   उपवनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :Vidarbhaविदर्भforestजंगल