शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या पाच हजारांसाठी पत्नीचा अश्लील फोटो व्हायरल, पतीचा कारनामा; तलाक देण्याचीही धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 21:15 IST

तक्रारीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पती पत्नी आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झडत असल्याने ती महिला माहेरी निघून गेली होती.

अमरावती : अवघ्या पाच हजारांसाठी चक्क पत्नीचा स्वत: सोबतचा अश्लील फोटो व्हायरल करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अलहिलाल कॉलनी येथे राहणाऱ्या २७ वर्षीय पतीविरुद्ध विनयभंग, खंडणी, धमकी व आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडली.

तक्रारीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पती पत्नी आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झडत असल्याने ती महिला माहेरी निघून गेली होती. दरम्यान ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास तो सासरी पोहोचला. तिला शिवीगाळ केली. तथा पाच हजार रुपयांची मागणी केली. ती रक्कम न दिल्यास तलाक देईल. तथा आपल्या सोबतचा अश्लील फोटो व्हायरल करेल,अशी धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेला.

भावाला पाठविला तो फोटो -पत्नीला धमकावत तो निघून गेला. अन् त्याने स्वत:सोबतचा पत्नीचा अश्लील फोटो पत्नीसह तिच्या भावाच्या मोबाइलवर पाठवून तो व्हॉट्सॲपवर व्हायरल केला. ते समजताच तिने नागपुरी गेट पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत यांनी तिची तक्रार नोंदवून घेतली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीPoliceपोलिस