अनैसर्गिक कृत्याने पत्नी त्रस्त, पोलिसात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:15 IST2021-08-29T04:15:27+5:302021-08-29T04:15:27+5:30

अमरावती : पतीने पत्नीवर वारंवार अनैसर्गिक कृत्य केले. तिला तीन वेळा तलाक म्हणून तलाक दिला. अश्लील शिवीगाळ करून मारहाण ...

Wife suffers from unnatural act, runs to police | अनैसर्गिक कृत्याने पत्नी त्रस्त, पोलिसात धाव

अनैसर्गिक कृत्याने पत्नी त्रस्त, पोलिसात धाव

अमरावती : पतीने पत्नीवर वारंवार अनैसर्गिक कृत्य केले. तिला तीन वेळा तलाक म्हणून तलाक दिला. अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. वारंवार जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य करीत असल्याने या प्रकाराला त्रस्त होऊन अखेर तिने पतीविरुद्ध तक्रार नोंदविली. ही घटना तीन महिन्यापूर्वी घडली. पतीविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

पोलीससूत्रानुसार, मोहम्मद शकील गुलाम अयुब शेख (३९, रा. छत्रसाल नगर) असे आरोपीचे नाव आहे. तो आपल्या २५ वर्षीय पत्नीसोबत छत्रसाल नगरात राहतो. तो लग्न झाल्यापासून नेहमीच अनैसर्गिक संभोग करतो. तिने विरोध दर्शविला असता, शिवीगाळ करून मारहाण करतो, त्याला अनैसर्गिक कृत्य करू देण्यास विरोध केल्यास ‘तू मेरे काम की नाही’, असे म्हणून तीन वेळा तलाक म्हणून तलाक दिला व शारीरिक व मानसिक छळ केल्याचे महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७७, ४९८ (अ), ५०४, ५०६ मुस्लिम महिला विवाहाचा अधिकार संरक्षण कायदा २०१९ ३ व ४ नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.

Web Title: Wife suffers from unnatural act, runs to police