सैनिक पतीच्या त्रासापायी पत्नीने जाळून घेतले
By Admin | Updated: December 8, 2015 00:19 IST2015-12-08T00:19:34+5:302015-12-08T00:19:34+5:30
सैनिक पती व सासू-सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून पत्नीने जाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी खल्लाजवळील घडा सांगवा गावात घडली.

सैनिक पतीच्या त्रासापायी पत्नीने जाळून घेतले
उपचारादरम्यान मृत्यू : खल्लारजवळील घडा सांगवातील घटना
खल्लार : सैनिक पती व सासू-सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून पत्नीने जाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी खल्लाजवळील घडा सांगवा गावात घडली. ज्योत्स्ना सचिन वानखडे (२५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणात खल्लार पोलिसांनी सासरे प्रेमदास साहेब वानखडे (५५) याला अटक केली आहे.
ज्योत्स्ना हिचा १८ एप्रिल २०१३ मध्ये सैनिक सचीन वानखडेशी विवाह झाला. त्यांना दोन वर्षांचा हर्षल नावाचा मुलगा आहे. मात्र, सचिन हा ज्योत्स्नाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करीत होता. यात सचिनला आई-वडिलांचेही सहकार्य मिळाले होते. २ डिसेंबर रोजी सचिन हा सुट्टी घेऊन घडा सांगवा येथे आला. दरम्यान ६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता त्यांच्यात वाद उफाळला. रागाच्या भरात ज्योत्सनाने अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. तिने वेदनेच्या भरात सचिनला कवटाळले. यामध्ये ज्योत्स्ना १०० टक्के भाजल्या गेली तर सचिन ५५ टक्के भाजला. दोघांनाही दर्यापूरच्या एका दवाखान्यात मध्यरात्री दाखल करण्यात आले. मात्र, ज्योत्स्नाची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला पहाटे ५.१५ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती खल्लार पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ इर्विन रुग्णालय गाठले. जळीत ज्योत्स्नाचे बयाण नोंदविल्यावर ज्योत्स्नाने सर्व घटनाक्रम सांगितला. दुपारी १२ वाजता दरम्यान ज्योत्स्ना उपचार मृत्यू झाला. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी पती, सासू व सासऱ्याविरुध्द भादंविच्या कलम ३०६,३४, ४९८ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून सासरा प्रेमदास वानखडेला अटक केली आहे.