शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
2
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
3
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
4
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
5
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
6
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
7
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
8
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
9
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
10
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
11
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!
12
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
13
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
14
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!
15
Railway: रेल्वे ट्रॅकजवळ रील बनवणाऱ्यांची आता खैर नाही; प्रशासनानं उचललं कठोर पाऊल!
16
मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
17
Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
18
Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
19
Social Media Earning: इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून कसे कमवता येतात पैसे? तुम्हीही बनू शकता लखपती! जाणून घ्या
20
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा

स्वत:ची किडणी देऊन तिने वाचवले पतीचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 20:19 IST

पत्नीने पतीला किडणी दान करून अर्धांगिनीचा अर्थ समाजाला सांगितला.

 अमरावती - पत्नीने पतीला किडणी दान करून अर्धांगिनीचा अर्थ समाजाला सांगितला. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक व वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी ही सातवी किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.अमरावती शहरातील संजय रामराव लोनसने (५४) दोन वर्षांपासून किडणीच्या आजाराने त्रस्त होते. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात किडणी प्रत्यारोपणाचा सल्ला डॉक्टरांनी दिला. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, वैद्यकीय अधीक्षक व विशेष कार्य अधिकारी टी.बी. भिलावेकर यांच्या मार्गदर्शनात रुग्ण व नातेवाइकांना समुपदेशन करण्यात आले. यावेळी संजय लोनसने यांची पत्नी माधवी यांनी किडणी दान करण्यास होकार दिला. डॉक्टरांच्या चमूने विविध चाचण्या केल्यानंतर माधवी यांची किडणी जुळल्याचा अहवाल दिला. मंगळवारी किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून माधवी यांनी पती संजयला जीवनदान दिले. 

नागपूर येथील तज्ज्ञांकडून शस्त्रक्रियानागपूर येथील किडणी प्रत्यारोपण तज्ज्ञ तथा युरोलॉजिस्ट संजय कोलते, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. निशांत बावनकुळे यांची शस्त्रक्रियेसाठी विशेष उपस्थिती होती. याशिवाय सुपर स्पेशालिटीतील युरोसर्जन राहुल पोटोडे, विक्रम देशमुख, राहुल घुले, नेफ्रोलॉजिस्ट अविनाश चौधरी, सौरभ लांडे, बधिरीकरण तज्ज्ञ रामप्रसाद चव्हाण व प्रणित घोनमोडे यांनी काम पाहिले. 

यांनी सांभाळली कायदेशीर प्रक्रिया किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याकरिता किडणी ट्रान्सप्लान्ट को-आॅडिनेटर मोनाली चौधरी व समाजसेवी अधीक्षक नवनाथ सरवदे, सतीश वडनेरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अधिसेविका माला सुरपाम, ओटी स्टाफ प्रतिभा अंबाडकर, नीता श्रीखंडे, ज्योती तायडे, मनीषा कांबळे, दुर्गा घोडिले, ज्योती काळे, रीतू बैस, आयसीयू स्टाफमधील आशा गडवार, अलका मोहोड, भारती घुसे, जमुना मावस्कर, शुभांगी टिंगणे, नम्रता दामले, कविता बेरड यांनी कामकाज पाहिले. 

यांचे लाभले सहकार्ययवतमाळ येथील राज्य प्राधिकार समितीचे अधिष्ठाता मनीष श्रीगिरीवार, समिती अध्यक्षा स्नेहल कुळकर्णी, अकोला येथील आरोग्य उपसंचालक आर.एस. फारुकी, यवतमाळचे जिल्हा शल्यचिकित्सक टी.सी. राठोड व दिनकर पाटील या समिती सदस्यांनी शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेला मान्यता दिली. यवतमाळ मेडिकल कॉलेजमधील डॉ. मीनल चव्हाण, प्रकाश येणकर यांचे सहकार्य लाभले. ट्रान्सप्लॉन्ट यशस्वीतेसाठी अशोक किनवटकर, अमोल वाडेकर, विनोद पाटील, प्रफुल्ल निमकर, कुंदन मातकर तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, तांत्रिक कर्मचारी व कार्यालयीन व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टॅग्स :FamilyपरिवारAmravatiअमरावतीHealthआरोग्य