पत्नीला लोखंडी झाऱ्यांने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:09+5:302021-04-05T04:12:09+5:30
अमरावती: मद्यपी पतीन पत्नीला लोखंडी झाऱ्याने मारहाण करण्यात आल्याची घटना अंकुरनगरात शनिवारी घडली. या प्रकरणी आरोपी शुभम पांडे(२८, ...

पत्नीला लोखंडी झाऱ्यांने मारहाण
अमरावती: मद्यपी पतीन पत्नीला लोखंडी झाऱ्याने मारहाण करण्यात आल्याची घटना अंकुरनगरात शनिवारी घडली.
या प्रकरणी आरोपी शुभम पांडे(२८, रा. अंकुर नगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पत्नीला जखमी केल्याने तिने राजापेठ पोलसात धाव घेवून तक्रार नोंदविली. पोलिसांनी भादविची कलम ३२४, ५०४,५०६ अन्यवे गुन्हा नोंदविला.
---------------------------------------------
लोखंडी सलाख चोरी
अमरावती: घराकामाच्या बाजुला खुल्या जागेत ठेवलेल्या १२ हजाराच्या लोखंडी सलाख अज्ञात आरोपीने चोरुन नेल्याची घटना नागपुरीगेट ठाणे हद्दीतील पॅरामाउंट कॉलनीत घडली. या प्रकरणी फिर्यादी मोहम्मद आसीफ वल्द मोहम्मद अनीस (३६, रा. जनता कॉलनी हबीब नगर) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादविची कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
------------------------------------------------------
चोरी करणाऱ्या आरोपीला पकडले
अमरावती: घरात घूसुन साहित्य अस्ताव्यस्त केले. तसेच कपाटातील २० हजाराच चोरले मात्र या ठिकाणी महिलेने आरडाओरड केल्याने आरोपीला पकडण्यात आले ही घटना शनिवारी रात्री घडली.
या प्रकरणी आरोपी सुधीर दशरथराव खिरळकर (३२, रा. इंदिरानगर भातकुली)असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी विक्रम बाळासाहेब वैद्य (३१, रा. इंदीरानगर भातकुली) यांनी तक्रार नोंदविली. आरोपीला फिर्यादी यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.
-------------------------------------------------------------------------------