१,६१५ कोटींच्या निधीतून होणार रस्त्यांचे रुंदीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 00:15 IST2017-04-02T00:15:05+5:302017-04-02T00:15:05+5:30
ह्याब्रीड प्रकल्प तत्त्वावर होत असलेल्या ११ राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाला मंजुरी मिळाली आहे.

१,६१५ कोटींच्या निधीतून होणार रस्त्यांचे रुंदीकरण
४० टक्के निधी राज्य शासनाचा : ११ राज्य महामार्गांचा समावेश
अमरावती : ह्याब्रीड प्रकल्प तत्त्वावर होत असलेल्या ११ राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाला मंजुरी मिळाली आहे. १६१५ कोटींच्या निधातून सदर रस्त्यांचे कामे होणार आहेत. ११ महामार्गावरील ४५९ किमीच्या रस्त्यांचे १० मीटरचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.
१,६१५ कोटींच्या निधीतून होत असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत असल्याने त्यासंदर्भाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे सरू झाले आहे. या प्रकल्पाकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर सदर कामांच्या ई - निविदा काढण्यात येणार आहे. सदर काम ज्या कंत्राटदाराला मिळाल्यानंतर या कामांवर ६० टक्के निधींची गुंतवणूक त्याला करावी लागणार आहे. सदर काम पूर्ण झाल्यानंतर शासन सदर कंत्राटदाराला १५ वर्षापर्यंत सदर कामांचे देयके परत करणार आहे. पण या १५ वर्षांमध्ये सदर रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल त्या कंत्राटदाराला करावी लागणार आहे. या कामांचे देयके शासन १५ पर्यंत अदा करणार असल्याच्य करारना म्यावरच काम देण्यात येणार असल्याची माहिती अमरावती बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता विवेक साळवे यांनी "लोकमत"शी बोलताना दिली आहे. ४५९ किलोमीटरचे करण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या रुंदीकरणामध्ये १० मीटर अंतरापर्यंत रस्त्याची रुंदी वाढविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सदर रस्ते हे जूनेच असुन सर्व र स्ते हे राज्यमहामार्ग आहे. या मार्गावरुन हजारो वाहनांची रोज मोठ्याप्रमाणात वर्दळ असते. यामध्ये अमरावती- मिनी बायपास, वलगाव- दर्यापूूर, अमरावती- भातकुली-आसरा, दर्यापूर - अंजनगाव, परतवाडा- चिखलदारा -घटांग, अमरावती - चांदुररेल्वे-धामणगांव रेल्वे, अमरावती् कुऱ्हा- कौंडण्यपूर आदी मार्गांचा समावेश आहे.
अमरावती जिल्ह्यातील राज्य महामार्ग क्र १२ पुलगाव ते कारंजा असा ७६.९० किलोमीटर लांबीचा रस्त्यांच्या कामांचेही यामध्ये समावेश राहणार आहे. त्यामुळे अनेक वेळा अरुंद रस्त्यांमुळे दोन वाहने समोरासमोर पास होतांना अनेक जीवघेणे अपघात घडतात.
सदर रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यानंतर वाढत्या अपघातावर नियंत्रण ठेवणे सोपी जाणार आहे. व वाहतूकही सुरळीत होण्यास मदत होणार आहे. सदर कामांचे अद्याप तरी ई-टेंडरींग झाले नसून सदर कामे खेचून आणण्यास पालकमंत्री प्रवीण पोटे यांचा सिंहाचा वाटा आहे. दोन महिन्यांत सदर कामे सुरू होणार असल्याचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर ई-निविदा होऊन दोन महिन्यांत सदर कामांना सुरुवात होईल कंत्राटदाराला कामांच्या तुलनेत ६० टक्के पैसे गुंतवणूक करावी लागणार आहे.
- विवेक साळवे, अधीक्षक अभियंता सा.बां. विभाग, अमरावती