शरीरसुखाची मागणी करून विधवेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST2021-05-06T04:14:02+5:302021-05-06T04:14:02+5:30

अमरावती : एका विधवा महिलेच्या घरात घुसून शरीरसुखाची मागणी केली. तसेच तिच्याकडे वाईट नजरेने बघून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ...

Widow's humiliation by demanding bodily pleasure | शरीरसुखाची मागणी करून विधवेचा विनयभंग

शरीरसुखाची मागणी करून विधवेचा विनयभंग

अमरावती : एका विधवा महिलेच्या घरात घुसून शरीरसुखाची मागणी केली. तसेच तिच्याकडे वाईट नजरेने बघून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सिटी कोतवाली ठाण्यांतर्गत मसानगंज येथे मंगळवारी घडली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आनंद प्रीतम ओरिया (२८, रा. मसानगंज) विरुद्ध भादंविचे कलम ४५२, ३५४, ३५४(अ), ३५४(ड), ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने तक्रार नोंदविली. पोलीससूत्रानुसार, महिलेचे पती २०१४ मरण पावल्याने ती चुलत सासारे यांच्या शेजारी राहते. ती मुलासह घरात झोपली असता, घराचा दरवाजा तुटला असल्याने त्याला कापडी पडदा लावला आहे. त्यामुळे रात्री अडीच वाजताच्या सुमारास आरोपीने घरात घुसून तिला शरीरसुखाची मागणी केली. आरोपी हा नेहमीच महिलेकडे वाईट नजरेने पाहून पाठलाग करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. महिलेने आरोपीला मनाई केली असता, त्याने मारहाण व शिवीगाळ करून मारण्याची धमकीसुद्धा दिली. पुढील पीएसआय श्रीकांत नारमोड करीत आहेत.

Web Title: Widow's humiliation by demanding bodily pleasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.