नोकरीचा हक्क नसणारी ‘टीईटी’ कशासाठी?
By Admin | Updated: November 2, 2014 22:27 IST2014-11-02T22:27:09+5:302014-11-02T22:27:09+5:30
जिल्ह्यातील १५ हजारांवर भावी शिक्षकांनी ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेचे अर्ज मागील आठवड्यात भरले. आता पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षेची काळजी सुरु आहे. ही परीक्षा उत्तीर्ण केली

नोकरीचा हक्क नसणारी ‘टीईटी’ कशासाठी?
गजानन मोहोड - अमरावती
जिल्ह्यातील १५ हजारांवर भावी शिक्षकांनी ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेचे अर्ज मागील आठवड्यात भरले. आता पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षेची काळजी सुरु आहे. ही परीक्षा उत्तीर्ण केली तरीही उमेदवारांना नोकरीसाठी कुठलाही हक्क राहणार नाही, असे शासन आदेशात स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे थेट नोकरी न देणारी ‘टीईटी’ आहे तरी कशासाठी? असा सवाल भावी शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
शिक्षण संचालनालयाची अध्यापक पदविका परीक्षा व त्यानंतर ‘टिईटी’ परीक्षा कशासाठी? शासनाने स्वत: घेतलेल्या निर्णयावर विश्वास नाही काय? यासह अनेक प्रश्न भावी शिक्षकांनी उपस्थित केले आहे. हे प्रश्न तूर्तास अनुत्तरितच आहे.
डीएडसाठी प्रवेश देताना इयत्ता १२ वी पास हा निकष लावण्यात आला होता. त्यामुळे सरगकत परीक्षा अर्ज भरुन देण्याऐवजी परीक्षा अर्ज भरताना १२ वी पास व नंतर डीएड झालेल्या विद्यार्थ्यांना एक पेपर तसेच डीएड व पदव्यूत्तर भावी शिक्षकांना दोन परीक्षा अर्ज भरावे लागले. यासाठी अतिरिक्त शुल्काची रक्कम मोजावी लागत आहे. डीएड प्रवेश ते परीक्षा या प्रक्रियेत खर्च पुरविताना पालकांच्या नाकीनऊ आले. आता टीईटीसाठी पुन्हा नव्याने शुल्क भरावे लागत आहे. पालकांसाठी हे अवघड आहे. मात्र हे शुल्क भरुन परीक्षा दिल्यानंतरही नोकरीचा हक्क नसणारी ही परीक्षा आहे. परीक्षेसाठी एकाचे निकष लावले जावेत, अशी भावी शिक्षकांची मागणी आहे. जिल्ह्यात शेकडो शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यांची अद्याप इतरत्र नियुक्ती करण्यात आली नाही. त्यांना सेवेत केव्हा सामावले जाणार, हा प्रश्न भावी शिक्षकांनी उपस्थित केला आहे.