दीपाली आत्महत्याप्रकरणी मेळघाटातील एनजीओ गप्प का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:13 IST2021-04-09T04:13:29+5:302021-04-09T04:13:29+5:30

अमरावती : मेळघाटात एखाद्या वन्यजीवांची शिकार वा हत्या झाल्यास थयथयाट करणारे सामाजिक संस्थांचे पदाधिकारी (एनजीओ) हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली ...

Why NGOs in Melghat are silent on Deepali suicide case? | दीपाली आत्महत्याप्रकरणी मेळघाटातील एनजीओ गप्प का?

दीपाली आत्महत्याप्रकरणी मेळघाटातील एनजीओ गप्प का?

अमरावती : मेळघाटात एखाद्या वन्यजीवांची शिकार वा हत्या झाल्यास थयथयाट करणारे सामाजिक संस्थांचे पदाधिकारी (एनजीओ) हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी गप्प आहेत. दीपाली यांना न्याय मिळावा, यासाठी ना जिल्हाधिकारी, ना जिल्हा पाेलीस अधीक्षकांना निवेदन देऊन सामाजिक दायित्वाचा परिचय दिला नसल्याचे वास्तव आहे.

मेळघाटात वन्यजीव, आदिवासींचा विकास, योजनांच्या अंमलबजावणीसाठी १५० च्यावर एनजीओ कार्यरत आहे. मेळघाटचे कुपोषण, वाघांचे संवर्धन, आदिवासींचे आरोग्य, शिक्षणासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराहून निधी येतो. मेळघाटात कुपाेषणाने बाल दगावले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज बुंलद करण्यासाठी सतत प्रसिद्धी झोतात असणारे एनजीओंनी मात्र दीपाली आत्महत्या प्रकरणी ‘ब्र’ देखील काढलेला नाही. त्यामुळे मेळघाटातील एनजीओ हे केवळ अर्थकारण, कुपोषण, आरोग्य, शिक्षण आणि वन्यजीवाच्या नावे मलिदा ओरपणासाठी कार्यरत आहे का? असा प्रश्र्न उपस्थित होत आहे. दीपाली यांना जाऊन आता १४ दिवस झाले. तिच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला अटक झाली. परंतु, दीपाली यांच्या सुसाईट नोटमध्ये नमूद असल्याप्रकरणी निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी हादेखील तितकाच जबाबदार आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी पोलिसांत दिलेल्या बयाणात एम.एस. रेड्डी हे देखील दोषी असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर दीपाली याच्या आईने सुद्धा रेड्डी कारणीभूत आहे, असे बयाण नोंदविले आहे. त्यामुळे दीपाली आत्महत्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांची भूमिका संदिग्ध असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनातून केला आहे. परंतु, दीपाली आत्महत्या प्रकरण दिल्लीपासून गल्लीपर्यंत गाजत असताना मेळघाटच्या भरोशावर गब्बर झालेले एनजीओ्ंना या प्रकरणी गप्प असल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

------------------

मेळघाटात गेल्या २५ वर्षांपासून कुणाचेही अहित होऊ नये, याच भावनेने कर्तव्य बजावत आहोत. अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनुकुल परिस्थिती असावी, यात दुमत नाही. पुन्हा मेळघाटात दीपाली कुणी होऊ नये, यासाठी प्रशासनात समन्वय असावा. बदली मागितल्यास नियमानुसार झालीच पाहिजे.

- बंड्या साने, खोज संघटना, मेळघाट

Web Title: Why NGOs in Melghat are silent on Deepali suicide case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.