शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
2
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
3
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
4
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
5
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
6
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
7
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
8
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
9
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
10
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
12
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
13
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!
14
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
15
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
16
Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
17
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
18
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन्स दिले...
19
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
20
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...

"माझी दारू का प्यायलीस?" : बापाने डोक्यावर काठी घालून केली मुलाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:32 IST

Amravati : वरूड पोलिस घटनास्थळी, आरोपी पिता अटकेत, काठीने डोक्यावर मार

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड / जरुड : स्वतःसाठी आणलेले दारू तरूण मुलगा प्यायल्याने संतापलेल्या बापाने मुलाच्या डोक्यावर काठीने प्रहार करून त्याला संपविले. तालुक्यातील बहादा येथे सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ती घटना घडली. दिलीप हिरामण धुर्वे (वय ३५, रा. बहादा) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी वरूड पोलिसांनी आरोपी पिता हिरामण जितुजी धुर्वे (वय ६५, रा. बहादा) याला अटक केली आहे. दिलीपने बापाने आणलेली दारू पिऊन घेतली. ती बाब समजताच  हिरामण याला संताप अनावर झाला. त्या वादादरम्यान हिरामण याने दिलीप याच्या डोक्यावर काठीने वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

मृत दिलीप हा विवाहित असून, त्याला पत्नी, पाच वर्षाची मुलगी व अडीच वर्षीय मुलगा आहे. ते सर्व कुटुंब एकत्र राहत होते. मात्र दिलीप हा कुठलाही कामधंदा न करता दारूच्या आहारी गेला होता. त्यातून त्यांचे रोजच वाद होत असे. सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दारूच्या नशेत असताना बापलेकात वाद झाला. खुनाची घटना शेजाऱ्यांना माहिती होताच वरूड पोलिसांना माहिती देण्यात आली. वरूडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे, उपनिरीक्षक दीपक दळवी यांनी बहादा येथे जाऊन घटनास्थळ पंचनामा केला. तर एसडीपीओ संतोष खांडेकर यांनी देखील भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती