अख्खे घर साफ करणाऱ्या चोरट्यास अटक
By Admin | Updated: June 9, 2017 00:20 IST2017-06-09T00:20:29+5:302017-06-09T00:20:29+5:30
बंद घराला निशाना साधून चोरून नेलेल्या अख्ख्या साहित्यासह २४ तासांत आरोपींना पकडण्यात अचलपूर पोलिसांना बुधवारी यश आले.

अख्खे घर साफ करणाऱ्या चोरट्यास अटक
२४ तासांत जेरबंद : अचलपूर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : बंद घराला निशाना साधून चोरून नेलेल्या अख्ख्या साहित्यासह २४ तासांत आरोपींना पकडण्यात अचलपूर पोलिसांना बुधवारी यश आले.
अचलपूर शहरातील मधुकर भास्कर चांदणे (७२, रा. बिलनपुरा) हे परिवारासह २४ मे रोजी बाहेरगावी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने सोने-चांदीच्या दागिन्यासह सिलिंडर, भांडी, कपडे आदी जवळपास ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्याची फिर्याद ५ जून रोजी अचलपूर पोलिसात दाखल केली होती. ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी कर्मचारी सुजित कांबळे, विनोद राऊत, पुरुषोत्तम बावनेर, सचिन भोंबे यांच्यासह चमूने चोरट्याचा अचूक सुगावा २४ तासांत लावला. अचलपूर शहरातील बिलनपुरा भागात राहणाऱ्या गोलू ऊर्फ नीरज वासुदेव सुरटकर (२३) याला ताब्यात घेतले.
शहरात चोरट्यांसह असामाजिक तत्त्वाची पोलिसांनी तपासणी सुरू केली असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुन्ह्याचा तपास करण्यात यश आले आहे.
- आधारसिंग सोनोने,
ठाणेदार, अचलपूर