शकुंतलेला सुस्थितीत आणणार कोण ?

By Admin | Updated: July 19, 2015 00:20 IST2015-07-19T00:20:27+5:302015-07-19T00:20:27+5:30

ताशी पाच कि.मी. च्या वेगाने चालणाऱ्या व रेल्वे क्रॉसींगवर गाडी थांबवून स्वत: गेट बंद करणाऱ्या ड्रायव्हरसह चालणारी...

Who will bring Shakuntala in good repair? | शकुंतलेला सुस्थितीत आणणार कोण ?

शकुंतलेला सुस्थितीत आणणार कोण ?

अंजनगाव सुर्जी : ताशी पाच कि.मी. च्या वेगाने चालणाऱ्या व रेल्वे क्रॉसींगवर गाडी थांबवून स्वत: गेट बंद करणाऱ्या ड्रायव्हरसह चालणारी शकुंतला रेल्वे सुस्थितीत आणण्यासाठी पाच कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयातून प्राप्त झाली आहे. सत्याहत्तर किलो मिटर लांबीच्या अचलपूर ते मुर्तिजापूर ह्या मार्गावरील रेल्वेचा बहुतांश भाग खासदार अडसूळांच्या मतदार संघातून जातो. प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी या मार्गावर पाच कोटी रुपयाच्या खर्चाची तरतुद खासदार अडसूळ करु शकतात. यासाठी त्यांचे प्रयत्न आवश्यक आहेत.
हा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज मध्ये परिवर्तीत करण्याची फार पुर्वीची मागणी आहे पण त्याकरीता पाचशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे. उत्पन्नाचा मोबदला नगण्य असल्याने रेल्वे मंत्रालयाने ब्रॉडगेज योजना थंड बस्त्यात टाकली आहे.
इंग्लडच्या क्लिक अ‍ॅन्ड निकसन कंपनीने शंभर वर्षापुर्वी सन १९१६ साली केलेल्या करारानुसार कंपनीचा ५५ टक्के नफा व भारतीय रेल्वेचा ४५ टक्के नफा या तत्वावर हि रेल्वे चालविली. पुढील वर्षापर्यंत हा करार संपणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या पिटीशन कमेटीत दावा दाखल करुन खासदार महोदयांनी यासाठी पाठपुरावा केला पण मोठ्या बजेट मुळे त्यांची मागणी पुर्णत्वास गेली नाही तरी रेल्वेला सुस्थितीत आणण्यासाठी व आवश्यक कामकरण्यासाठी हवे असेलेले पाच कोटी रुपये खासदार निधीतून अडसूळ देवू शकतात.
अर्थात असा निधी देण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे काय, हे पडताळूनच त्याचे उत्तर मिळू शकते. पण गरीबांचे वाहन म्हणून लोकप्रिय असलेल्या शकुंतलेचा उध्दार जर पाच कोटी रुपयोन होवू शकत असेल तर खासदार महोदयांनी या करिता प्रयत्न केले पाहिजेत अशी या मार्गावरील प्रवाश्यांची इच्छा आहे.

Web Title: Who will bring Shakuntala in good repair?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.