जि.प.अध्यक्षपदाची लॉटरी लागणार कुणाला ?
By Admin | Updated: June 10, 2016 00:11 IST2016-06-10T00:11:11+5:302016-06-10T00:11:11+5:30
आमागी सन २०१७ मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत ...

जि.प.अध्यक्षपदाची लॉटरी लागणार कुणाला ?
उत्कंठा शिगेला : आज आरक्षण सोडत
अमरावती : आमागी सन २०१७ मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार १० जून रोजी मंत्रालयातील सह्याद्री अतिथीगृहात राज्याच्या ग्रामविकासमंत्री पकंजा मुडे यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुशंगाने अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुणाच्या वाटयाला येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मार्च २०१७ मध्ये विदर्भातील सात आणि उर्वरित राज्यात जवळपास २६ ठिकाणी जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासर्व निवडणुका एकाचवेळी होत असल्याने मिनी मंत्रालयाच्या या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदाचे आरक्षण कुणाच्या वाट्याला येते, यावरच पुढील राजकीय घडामोडी अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे राजकीयक्षेत्रात या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
सर्कल आरक्षणाकडे अधिक लक्ष
एकीकडे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार असली तरी ग्रामीण भागाच्या विकासाचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या जि.प.च्या आगामी निवडणुकीच्या अनुशंगाने जिल्हा परिषदेच्या ५९ सर्कलचे आरक्षण अद्याप काढण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या अध्यक्षपदासोबतच सर्कल आरक्षण सोडतीकडे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने आरक्षणाबाबत राजकीय समीकरणे मांडली जाणार आहेत.