‘त्या’ आदीवासी मुलीचे लैंगिक शोषण करणारा कोण?

By Admin | Updated: December 30, 2014 23:26 IST2014-12-30T23:26:34+5:302014-12-30T23:26:34+5:30

सात महिन्याच्या गर्भवती आदीवासीचे मुलींचे डफरीनमध्ये सिझर करण्यात आले असून बाळबाळंतीणीची प्रकृती गंभिर आहे. त्यामुलीवर इर्विनच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून बाळांचाही

Who is sexually exploited of a tribal girls? | ‘त्या’ आदीवासी मुलीचे लैंगिक शोषण करणारा कोण?

‘त्या’ आदीवासी मुलीचे लैंगिक शोषण करणारा कोण?

अमरावती : सात महिन्याच्या गर्भवती आदीवासीचे मुलींचे डफरीनमध्ये सिझर करण्यात आले असून बाळबाळंतीणीची प्रकृती गंभिर आहे. त्यामुलीवर इर्विनच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून बाळांचाही उपचार डफरीनच्या अतिदक्षता विभागात सुरु आहे. मात्र त्या मुलीचे लैंगिक शोषण करुन गर्भवती बनविणारा कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धारणी येथील चुटीया गावातील रहिवासी एका १९ वर्षीय मुलगी दोन महिन्यापुर्वी कवंरनगर येथील शासकीय आदीवासी मुलींच्या वसतीगृहात आली होती. धारणी उपजिल्हा रुग्णालयाचे तीच्याकडे फिटनेस प्रमाणपत्र असल्याने तीला वसतीगृहात प्रवेश देण्यात आला होता. सोमवारी सकाळी अचानक त्या मुलीची प्रकृती बीघडल्याने तीला तत्काळ वसतीगृहातील पदाधिकाऱ्यांनी इर्विन रुग्णालयात दाखविले. त्यावेळी त्या मुलींची सोनोग्राफी काढण्यात आली. सोनोग्राफीचा अहवाल मिळताच ती सात महिन्याची गर्भवती असल्याचे समजले. त्यामुळे तीला तत्काळ डफरीन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी १.३० वाजता डफरीन रुग्णालयात तीचे सिझर करण्यात आल्यावर तीने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र बाळबाळतींणींची प्रकृती अचानक बिघडली. बाळबाळतींण गंभीर अवस्थेत असल्याचे डॉक्टरांने सांगितले.
सद्यस्थितीत ती मुलगी इर्विन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात असून तीचे बाळ डफरीन रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात आहे. या घटनेची माहिती काही सामाजीक कार्यकर्तांना लागताच नगरसेवक राजु मसराम , रामेश्वर युवनाते, जयंता वाढीवे, सीमा मसकाम व प्राची आतराम यांनी तत्काळ दखल घेवून रुग्णालयात पाचारण केले. त्या मुलीच्या उपचाराची सर्व व्यवस्था करीत त्या नराधम मुलांचा शोध घेण्याचे कार्य त्यांनी सुरु केले आहे.

Web Title: Who is sexually exploited of a tribal girls?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.