शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

एक टक्का लाच कुणाची ? एसीबीकडून शोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:22 AM

महापालिका आयुक्त हेमंत पवार यांचा सचिव तथा कनिष्ठ लिपिक योगेश कोल्हे याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केल्यानंतर एसीबीने गुरुवारी आयुक्त कार्यालयाची झाडाझडती घेतली. उपअधीक्षक जयंत राऊत यांच्या नेतृत्वात एसीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली.

ठळक मुद्देआयुक्त कार्यालयाची झाडाझडती : सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका आयुक्त हेमंत पवार यांचा सचिव तथा कनिष्ठ लिपिक योगेश कोल्हे याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केल्यानंतर एसीबीने गुरुवारी आयुक्त कार्यालयाची झाडाझडती घेतली. उपअधीक्षक जयंत राऊत यांच्या नेतृत्वात एसीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. कोल्हे याने ती लाच कुणासाठी स्वीकारली हा तपासाचा भाग असला तरी एसीबीकडून एक टक्का कुणाचा? याबाबत सूक्ष्म चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.सोमवारी दुपारी ४.१० च्या सुमारास बांधकाम कंत्राटदाराकडून वरिष्ठांची स्वाक्षरी मिळवून देण्यासाठी १ हजार लाच स्वीकारताना योगेश कोल्हे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. एकूण रकमेच्या एक टक्का लाच म्हणून कोल्हेने २ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती ती रक्कम १ हजार रुपये निश्चित झाली. ती स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी, तर बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी त्याला जामीन मिळाल्याची माहिती एसीबीने दिली.दरम्यान गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास एसीबीचे उपअधीक्षक जयंत राऊत पथकासह महापालिका आयुक्त कार्यालयात दाखल झाले. आयुक्तांच्या सचिव कार्यालयात सीसीटीव्ही लागले आहेत. त्या अनुषंगाने या पथकाने आयुक्तांच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये असलेल्या संगणकावर पीए कॅबिनचे एकूणच फुटेज तपासले. बांधकाम कंत्राटदाराकडून लाच घेतानाच संपूर्ण प्रसंग त्या फुटेजमध्ये आहे की कसे ? याची पडताळणी त्यांनी केली. तसेच सोमवारपूर्वीच्या उपलब्ध फुटेजमधून कोल्हेने यापूर्वी कुणाकडून लाच स्वीकारली की काय? याची खातरजमा केल्याचे सांगण्यात आले.या पथकाने मंगळवारी सायंकाळी तब्बल दोन तास पीएंच्या दालनाची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी कोल्हेसुद्धा त्यांच्यासमवेत होता. गुरुवारी सीसीटीव्ही फुटेज तपासणीवेळी कोल्हे नव्हता. महापालिकेचे कार्यालय अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांच्या उपस्थितीत एसीबीने अ‍ॅन्टीचेंबरमध्ये ती सर्व तपासणी पूर्ण केली. याबाबत आयुक्तांनाही विचारणा केली जाईल.लाचखोरांचे दणाणले धाबेमहापालिकेत वरिष्ठांसह कुठल्या विभागप्रमुखाने त्याच्या स्वाक्षरीचा किती मोबदला ठरवला आहे, हे सर्वश्रूत आहे. महापालिकेशी संबंधित व्यक्ती वा संस्थांना ते सांगण्याची गरज नाही. मात्र, कोल्हे रंगेहाथ पकडला गेल्याने महापाािलकेतील सर्वच लाचखोरांची पाचावर धारण बसली आहे. काही दिवसांसाठी का होईना, कोल्हेंचे प्रकरण शांत होईपर्यंत लाच मागायची नाही आणि स्वीकारायची पण नाही, असा पवित्रा घेण्यात आला आहे.गेम कुणाचा, फसला दुसराचसंबंधिताला कोल्हेला पकडून द्यायचेच नव्हते. तो सापळा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी रचण्यात आला. मात्र, त्याच्याऐवजी कोल्हे पकडला गेला. अशी प्रतिक्रिया महापालिकेत उमटली आहे. एकूण बिलावर एक टक्का हा अधिकाऱ्याचा असतो. त्यामुळे तो सापळा अन्य अधिकाऱ्यांसाठीच असल्याच्या शक्यतेला दुजोरा दिला जात असून, संबंधिताने सजग होण्याची गरज असण्याचा सल्लाही अनाहूतपणे दिला जात आहे. कोल्हे याने ती लाच कुणासाठी स्वीकारली, याची कबुली दिल्याची माहिती आहे. मात्र, त्याला एसीबीकडून दुजोरा मिळाला नाही. महापालिकेतील एका प्रभारी व्यक्तीशी संधान बांधून हा‘ गेमप्लान’ करण्यात आल्याची व्यापक चर्चा आहे.देशमुखांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगीतत्कालीन उपायुक्त विनायक औगड हे मंत्रालयात परतल्यानंतर त्यांच्या पदाचा तात्पुरता प्रभार पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला. उपायुक्त प्रशासन म्हणून प्रतिनियुक्तीचा अधिकारी न आल्याने किंवा त्यासाठी प्रशासनाकडून व्यापक प्रयत्न करण्यात न आल्याने देशमुख मागील ११ माहिन्यांपासून तो चार्ज सांभाळत आहेत. मात्र, त्यांनी प्रभार स्वीकारताच औगडांच्या काळातील सचिव जितेंद्र भिसडे यांची तत्काळ बदली केली. सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेतला. त्यांच्यामते एका नॉन करप्टेड लिपिकाची उपायुक्त कार्यालयात बदली करवून घेतली. कोल्हेच्या लाचखोरीच्या पार्श्वभूमिवर देशमुखांनी त्यावेळी घेतलेला निर्णय आज त्यांच्या दूरदृष्टीचा परिचय करून देणारा ठरला आहे. तथापि आयुक्त हेमंत पवार यांनी सचिव न बदलल्याने त्यांना सोमवारच्या घटनेला सामोरे जावे लागले.