झेडपी शिक्षण व बांधकाम सभापती कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST2021-03-15T04:12:48+5:302021-03-15T04:12:48+5:30

अमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम सभापतीपद रिक्त झाल्याने येत्या शनिवार, २० मार्च रोजी त्यासाठी निवडणूक प्रक्रिया होणार ...

Who is the Chairman of ZP Education and Construction? | झेडपी शिक्षण व बांधकाम सभापती कोण?

झेडपी शिक्षण व बांधकाम सभापती कोण?

अमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम सभापतीपद रिक्त झाल्याने येत्या शनिवार, २० मार्च रोजी त्यासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी काँग्रेस सदस्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. मात्र, पालकमंत्री, जिल्हा परिषद तथा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख तथा माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा शब्द त्यासाठी प्रमाण राहणार आहे.

जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात २० मार्च रोजी सकाळी ११ वाजतापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. निवडणूक कार्यक्रमानुसार, शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येतील. सभेचे कामकाज दुपारी ३ वाजता सुरू होईल व सभापतीपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखविणे व नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येईल. छाननी संपल्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर उमेदवारी मागे घेतलेल्या व्यक्तींची व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वाचून दाखविण्यात येतील. आवश्यकता भासल्यास तात्काळ मतदान, मतमोजणी व इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. विशेष सभेच्या दरम्यान सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझरचा वापर व इतर दक्षतेचे पालन करणे आवश्यक असल्याचीही सूचना संबंधितांना देण्यात आली आहे.

-----------------------

Web Title: Who is the Chairman of ZP Education and Construction?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.