‘ पांढरं’ हीच बिबट्याच्या अस्तित्वाची खूण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST2021-02-05T05:22:44+5:302021-02-05T05:22:44+5:30
पान ३ गस्तीदरम्यान वन कर्मचारी मानतात पुरावा : पोहरा बंदी : पोहरा-चिरोडी जंगलाचा राजा बिबट्याचे अस्तित्व त्याच्या विष्ठेवरून वनरक्षक, ...

‘ पांढरं’ हीच बिबट्याच्या अस्तित्वाची खूण
पान ३
गस्तीदरम्यान वन कर्मचारी मानतात पुरावा :
पोहरा बंदी : पोहरा-चिरोडी जंगलाचा राजा बिबट्याचे अस्तित्व त्याच्या विष्ठेवरून वनरक्षक, वनमजूर मान्य करतात. ती ताब्यात घेऊन योग्यप्रकारे साठवली जाते आणि तिचे विश्लेषणात बिबट्यांच्या विष्ठेची पाहणी करून या बिबट्याने जंगलातील कोणत्या वन्यप्राण्याची व पाळीव प्राण्याची शिकार केली हे ओळखले जाते.
चिरोडी वर्तुळातील वनरक्षक जंगल गस्त करण्याकरिता गेले असता त्यांना वरुडा जंगलात झाडाझुडपात बिबट्याची विष्ठा आढळून आली. जंगलात बिबट्याची विष्ठा क्वचितच दिसून येते. वडाळी आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील बडनेरा, वडाळी, पोहरा, चिरोडी, माळेगाव, चांदूर रेल्वे या वर्तुळाच्या वनक्षेत्रात विविध वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. अनेकदा बिबट, नीलगाय, हरीण, काळवीट, चितळ, रानडुक्कर आदी वन्यप्राणी नागरिकांच्या दृष्टीस पडले आहेत. बिबट्याची छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. तलावाशेजारच्या जंगलात नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. या जंगलात बिबट्याच्या हालचाली वाढल्या आहेत. बिबट्याचे अस्तित्व सिद्ध झाल्याने वनविभाग सतर्क झाला आहे.