कुजबुज सदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:15 IST2021-08-29T04:15:43+5:302021-08-29T04:15:43+5:30

तू सुखकर्ता... महाआघाडी सरकारावर तोफ डागण्यासाठी चर्चेत राहणाऱ्या खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा या दाम्पत्याने आपला रोख ...

Whisper Sadar | कुजबुज सदर

कुजबुज सदर

तू सुखकर्ता...

महाआघाडी सरकारावर तोफ डागण्यासाठी चर्चेत राहणाऱ्या खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा या दाम्पत्याने आपला रोख शनिवारी अमरावती शहरातील कुंभारवाड्याकडे वळविला. हे दोघे येथे काय करतात, याची उत्सुकता परिसरातील नागरिकांना होतीच. त्यामुळे त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मात्र, येथे त्यांनी आराध्यदेवताच्या मूर्ती घडविण्याची क्रिया कुंभार बांधवांकडून जाणून घेतली व त्यात सहभाग घेतला. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. आतुरता श्री गणपतीबाप्पा च्या आगमनाची - शपथ घेऊ या पर्यावरण पूरक मातीचे गणपती स्थापनेची, असे म्हणत त्यांनी परिसरातील लोकांना जिंकून घेतले नसते तरच नवल. नवनीत राणा यांची ‘टी डिप्लोमसी’ खूपच चर्चेत आली होती. आता गणेशोत्सवापूर्वी या उत्सवाचा माहोल त्यांच्या या कृतीने तयार झाला आहे.

- गणेश वासनिक, अमरावती

Web Title: Whisper Sadar