कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:17 IST2021-08-25T04:17:54+5:302021-08-25T04:17:54+5:30
अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामकाज म्हटले की, अधिकाऱ्यांवर दडपण येणे ही नित्याचीच बाब झाली आहे. ...

कुजबुज
अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामकाज म्हटले की, अधिकाऱ्यांवर दडपण येणे ही नित्याचीच बाब झाली आहे. पण, काम शिलेदाराने सांगितले म्हटले की, यात काही खुबी हमखास असते. हे ही जाऊ द्या. जबाबदारीचे काम असलेल्या अधिकाऱ्याला कामे करण्याचा उत्साह आहे. परंतु, वारंवार येणारे कामाचे टेन्शन आणि प्रकृती ठीक नसताना जराही न मिळणारी सवड यामुळे कंटाळलेल्या साहेबांचे एक वाक्य हमखास असते. ते म्हणजे - आता माझी थांबायचीच इच्छा नाही भाऊ!
जितेंद्र दखने