शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करताना शाळकरी आॅटो उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:00 IST

कॅम्पस्थित एनसीसी कँटिनसमोरील त्रिकोणी बगिच्याजवळ एक शाळकरी आॅटो उलटून आठ विद्यार्थिंनी किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. त्यामुळे आॅटोचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करीत जीवघेणी कसरत करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देजीवघेण्या प्रवासावर अंकुश कधी?एनसीसी कँटीनसमोरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कॅम्पस्थित एनसीसी कँटिनसमोरील त्रिकोणी बगिच्याजवळ एक शाळकरी आॅटो उलटून आठ विद्यार्थिंनी किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. त्यामुळे आॅटोचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करीत जीवघेणी कसरत करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असून, ही जीवघेणी वाहतूक चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारी ठरत आहे. शनिवारी आॅटो क्रमांक एमएच २७ एएफ-२४४३ मध्ये तब्बल आठ ते नऊ विद्यार्थ्यांना बसवून चालक एनसीसी कँटिनसमोरून चपराशीपुऱ्याकडे जात होता. दरम्यान एका दुचाकीस्वाराने आॅटोला कट मारल्याने चालकाचे संतुलन बिघडून आॅटो पलटी झाला. आतील विद्यार्थी एकमेकांच्या अंगावर दबल्याने आरडओरडा सुरू झाला. काही नागरिकांनी तत्काळ आॅटोतील मुलींना बाहेर काढले व आॅटो उभा केला. सुदैवाने आॅटोतील शाळकरी मुलांना किरकोळ दुखापत झाली. अन्यथा आॅटो उलटून अप्रिय घटना घडण्याची दाट शक्यता होती. याची माहिती फे्रजरपुरा पोलिसांना प्राप्त होताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी आॅटोचालक बंडू रामदास मोखळे (४५,रा.गजानननगर) याची कानउघाडणी केली. या घटनेची तक्रार झाली नाही, त्यामुळे पोलिसांनीही कारवाई न करता आॅटोचालकास सोडून दिले. मात्र, या घटनेवरून शहरातील आॅटोचालक अतिक्षमतेची प्रवासी वाहतूक करून शाळकरी मुलांच्या जिवाला धोका निर्माण करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.आॅटोचालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेतआॅटो उलटल्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. फे्रजरपुरा व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठले. आॅटोचालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे विद्यार्थिनी सांगत होत्या. मात्र, विद्यार्थिनींना काही दुखापत न झाल्याने त्यांनी तक्रार केली नाही आणि पोलिसांनी अधिक चौकशी किंवा वैद्यकीय तपासणी न करता आॅटोचालकास सोडून दिले.शहर पोलिसांची बघ्याची भूमिकाशहरात अतिक्षमतेची वाहतूक सर्रास सुरू असताना पोलीस बघ्यांचीच भूमिका घेत आहे. चौका-चौकांतून विविध मार्गाने जाणाºया आॅटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक सर्वांच्याच दृष्टीस पडते. मात्र, हा गंभीर प्रकार वाहतूक पोलिसांच्या दृष्टीस का पडत नाही, असा सवाल नागरिकांचा आहे. याविषयी अधिकाºयांचे मौन आहे.आॅटोचालकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डीओला सांगितले होते. या अपघाताची तक्रार नव्हती. त्यामुळे काही कारवाई करण्यात आली नाही.- आसाराम चोरमले,पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुराआॅटो पलटी झाल्याविषयीची माहिती माझ्यापर्यंत पोहचलेली नाही. चौकशी केल्यानंतर निश्चित काय ते सांगता येईल.- रणजित देसाई,सहायक पोलीस आयुक्त