रेल्वेतून उतरताना महिलेचे हात पाय धडावेगळे

By Admin | Updated: September 24, 2014 23:23 IST2014-09-24T23:23:02+5:302014-09-24T23:23:02+5:30

रेल्वेतून खाली उतरणाऱ्या एक महिलेचा अपघात झाल्याने तिचा एक हात व एक पाय निकामी झाल्याची दुर्देवी घटना नुकतीच चांदूरबाजार रेल्वेस्थानक परिसरात घडली.

While leaving the train, the woman's arms and legs crossed | रेल्वेतून उतरताना महिलेचे हात पाय धडावेगळे

रेल्वेतून उतरताना महिलेचे हात पाय धडावेगळे

चांदूरबाजार : रेल्वेतून खाली उतरणाऱ्या एक महिलेचा अपघात झाल्याने तिचा एक हात व एक पाय निकामी झाल्याची दुर्देवी घटना नुकतीच चांदूरबाजार रेल्वेस्थानक परिसरात घडली.
भुसावळ ते नरखेड दररोज चालणारी पॅसेंजर ट्रेन क्रमांक ५११८३ चांदूर बाजार येथे दुपारी १.४५ मिनिटांनी येते. फक्त २ मिनिटांचा थांबा घेऊन नरखेड मार्गाने मंगळवारी ही पॅसेंजर रेल्वे निर्धारित वेळेच्या २५ मिनिटे उशिरा आली.
‘चांदूर’ वाक्याने केला घात
चांदूरबाजार : रेल्वेमध्ये बुऱ्हाणपूर येथील नरेश नागदेव (३३ वर्षे) त्यांची पत्नी ३ मुले व मावशी शीतल लक्ष्मीचंद रामचंदानी (४५) समवेत अकोलाहून चांदूररेल्वेकडे जाण्याकरिता भुसावळ-नरखेड पॅसेंजरमध्ये चुकीने बसून बसले. सदर पॅसेंजर गाडी ही चांदूररेल्वेला जात नसल्याचे या कुटुंबाना अमरावती ते चांदूरबाजारमध्ये कळले. चुकीच्या गाडीत बसल्याचे चांदूरबाजारात कळताच हे कुटुंब रेल्वेतून उतरत असतानाच अचानक रेल्वे गाडीला सिग्नल मिळाल्याने पुढे निघत असतानाच शीतल लक्ष्मीचंद रामचंदानी (४५) ह्या उतरु लागल्या व अचानक पाय घसरुन रेल्वेच्या खाली पडल्या व त्यांचा उजवा हात व उजवा पाय रेल्वेच्या चाकात आले.
महिला रेल्वे खाली पडल्याचे पाहून प्रवाशांंनी ओरडाओरड केली. स्थानिक अधिकारी विनयकुमार यांनी रेल्वे थांबविण्यास सांगितले. प्रवासी रेल्वे खाली उतरले असता त्यांना शीतल रामचंदानी जिवंत आढळल्या. उपस्थितांनी त्यांना बाहेर काढून पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
यावेळी उपस्थितांनी १०८ या रुग्णसेवेच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधला असता ही रुग्णवाहिका ४५ मिनीटे रेल्वे स्थानकावर पोहचलीच नाही. ग्रामीण रुग्णालय, खासगी वाहिकांशी संपर्क साधूनही कोणतीच रुग्णवाहिका घटनास्थळावर न आल्याने नागरिकांनी या रुग्णवाहिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. गो.सी. टोम्पे महाविद्यालयाच्या खासगी रुग्णवाहिकेने जखमी शीतलला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर लगेच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
घटनेची माहिती रुग्णवाहिकेला दिल्यानंतरही ४५ मिनिटांपर्यंत कोणतीच रुग्णवाहिका पोहचू न शकल्यामुळे शीतल रामचंदानीचा १ हात व १ पाय कापून वेगळा पडला असतानाही त्यांनी हिंमत हारली नव्हती. त्या सर्व वेदना सहन करीत शुध्दीवर होत्या. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शिपाई चव्हाण घटनास्थळावर पोहचले. तसेच घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
रुग्णवाहिका उशिरा पोहचली घटनेची माहिती मिळताच वाहतूक शिपाई चव्हाण व 'लोकमत'च्या प्रतिनिधीने अनेकदा संपर्क साधूनही १०८ क्रमांकावर विचारपूस करण्यात वेळ घालविला. २ कि.मी. अंतर पार करायला या रुग्णवाहिकेला ४५ मिनिटांचा अवधी लागला.
चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात अपघात
सदर प्रवासी व त्यांच्या सोबतीला असणारे हेच् चुकीच्या गाडीत बसले होते. गाडी चांदूर रेल्वे ऐवजी चांदूर बाजारला पोहचल्याचे लक्षात येताच महिला व त्यांच्या सोबतचे घाईघाईने उतरु लागले. परंतु २ मिनिटांचा थांबा घेवून रेल्वे निघत असतानाच गाडी खाली उतरण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला.

Web Title: While leaving the train, the woman's arms and legs crossed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.