शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गडकरींनी हात वर केले तर बांधकाम मंत्र्यांनी नियोजन पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:16 IST

अनिल कडू परतवाडा : अमरावती- परतवाडा- धारणी बऱ्हाणपूर- इंदोर या आंतरराज्य मार्गाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आजही हा मार्ग ...

अनिल कडू

परतवाडा : अमरावती- परतवाडा- धारणी बऱ्हाणपूर- इंदोर या आंतरराज्य मार्गाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आजही हा मार्ग दुर्लक्षित आहे. खड्ड्यांसह अपघाताची मालिका सालाबादाप्रमाणे यंदाही सुरू झाली आहे. हा रस्ता लोकांच्या जीवावर उठला आहे. या रस्त्याच्या अनुषंगाने नितीन गडकरींनी आपले हात वर केले, बांधकाम मंत्र्यांनी नियोजन पळविळ्याने ही समस्या नागरिकांच्या जिव्हारी लागली आहे.

माजी खासदार अनंत गुढे यांच्या पत्राला उत्तर देताना हा राज्य महामार्ग महाराष्ट्र शासनाच्या पीडब्ल्यूडीकडे मेंटेनन्सकरिता असल्याचे त्यांनी ३० जूनच्या पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एशियन डेवलपमेंट बँक(एडीबी )अंतर्गत या रस्त्याचे मार्गी लागलेले काम काढून घेतले आहे. यात अमरावती जिल्ह्यात एडीबीला अधिक लांबीचे रस्ते दिल्याचे कारण पुढे केले गेले. या मार्गाचे काम हायब्रीड ॲन्युइटी अंतर्गत घेण्यास सुचविले आहे.

अमरावती-परतवाडा प्रमुख राज्य महामार्गाचे ५४ किलोमीटर लांबीचे काम सन २०१८ मध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे (एडीबी) देण्यात आले होते. एडीबीने या प्रमुख रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास तत्त्वतः मान्यताही दिली. रस्त्याचे सर्वेक्षण 1१२ सप्टेंबर २०१९ ला भोपाळ येथील आयकॉन इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे दिले. कंपनीने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. त्याचा डीपीआरही बनवला. जवळपास साडे सहाशे कोटी त्यावर खर्च अपेक्षित होता. या रस्त्याचे काम सुरु होण्याच्या अंतिम टप्प्यात होते.

बॉक्सर

स्ता २०१५ पासून रखडला

या मार्गाचा प्रश्न २०१५ पासून रखडला आहे. २०१५ ला हा मार्ग दुपदरीकरणासह दर्जावाढ आणि राष्ट्रीय महामार्गबाबत प्रस्तावित केला गेला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत सर्वेक्षण पूर्ण करून विकास आराखडा मंजूर केले गेले. बांधकाम विभागाच्या वरिष्ठांकडून या रस्त्यावर कुठलेही काम न घेण्याचे निर्देश अचलपूर बांधकाम विभागाला दिल्या गेले. पण, पुढे मांजर आडवी गेल्यामुळे हा रस्ता व प्रस्ताव मागे पडला. यानंतर सन २०१८ मध्ये हा रस्ता एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे दिला गेला. पण यातही मांजर आडवी गेली आणि रस्त्याचे काम रखडले.

--

रस्त्याचे आयुष्य संपले

अमरावती-परतवाडा हा आंतरराज्य महामार्ग ब्रिटिशकालीन आहे. त्याची अवस्था आज दयनीय झाली आहे. १८७५ ते १८८० च्या दरम्यान बांधल्या गेलेल्या या मार्गाचे आयुष्याच संपले आहे.

--

खड्डे कोण बुजविणार?

या मार्गावर परतवाडा ते पूर्णानगर दरम्यान लक्षवेधक गड्डे पडले आहेत. रस्ता कमी आणि खड्डेच अधिक आहेत. हा रस्ता मेंटेनन्स करिता रिद्धपूर येथील एका कंत्राटदाराकडे दिला आहे. पण, त्याने अजूनही रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवायला सुरुवात केलेली नाही.

दिनांक/02/09/21. फोटो