कुठे हरविले महसूलचे पथक ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST2020-09-08T05:00:00+5:302020-09-08T05:00:27+5:30

वाळूमाफियांनी चार ते सहा महिन्यांपासून मध्यप्रदेशच्या सौंसर येथून वाहणाऱ्या कन्हान व जाम नदीतून दररोज शेकडो टन रेतीची नियमबाह्यरित्या ओव्हरलोड वाहतूक चालविली आहे. महसूल व पोलिसांची नाममात्र कारवाई वाळूमाफियांशी साटेलोटे असल्याचा संशय बळकट बनवणारी ठरली आहे.

Where is the lost revenue squad? | कुठे हरविले महसूलचे पथक ?

कुठे हरविले महसूलचे पथक ?

ठळक मुद्देपोलिसांचीही डोळेझाक : रविवारी दिवसभर धावले रेतीचे ‘ओव्हरलोड डंपर’

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मध्यप्रदेशच्या रेतीचे ओव्हरलोड ट्रक रविवारी दिवसभर चांदूरबाजार मार्गे परतवाडा शहरात पोलिसांच्या डोळ्यांदेखत धावताना दिसून आले. या सर्वांवर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले महसूल पथक कुठे गेले? असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे.
वाळूमाफियांनी चार ते सहा महिन्यांपासून मध्यप्रदेशच्या सौंसर येथून वाहणाऱ्या कन्हान व जाम नदीतून दररोज शेकडो टन रेतीची नियमबाह्यरित्या ओव्हरलोड वाहतूक चालविली आहे. महसूल व पोलिसांची नाममात्र कारवाई वाळूमाफियांशी साटेलोटे असल्याचा संशय बळकट बनवणारी ठरली आहे. ओव्हरलोड रेतीचे डंपर रविवारी सकाळी चांदूरबाजारमार्गे मोठ्या प्रमाणात परतवाडा शहराच्या रस्त्यावरून धावत होते. हा सर्व प्रकार ‘लोकमत'ने कॅमऱ्यात कैद केला. तर वाहतूकसह पोलिसांचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष दिसून आले .
ओव्हरलोड ट्रक पकडण्यासाठी महसूल विभागाने गठीत केलेले पथक बेपत्ता होते. वाळू माफियांना पोलीस व महसूलचा छुपा आर्थिक पाठिंबा असल्याची चर्चा आहे .
दररोज २० पेक्षा अधिक ओव्हरलोड ट्रक धावत असताना नाममात्र कारवाई करून हप्ते बांधल्या गेल्याचे बोलले जात आहे. ही रेती चढ्या दराने विकली जात आहे. खऱ्याअर्थाने अवैध रेतीवर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल पर्यायाने तहसीलदार, एसडीओ, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची आहे. मात्र या स्तरावर आनंदी आनंद असल्याने रेतीतस्करांचे फावले आहे.

गरिबांची आर्थिक पिळवणूक
वाळू माफिया सहा आणि दहा चाकी ट्रक व डंपरमध्ये ओव्हरलोड रेती आणतात. तीनशे किलोमीटरचा प्रवास आणि नियमाने चार असलेली टनाची परवानगी पाहता ओव्हरलोड ट्रक चिल्लर विक्रीत अव्वाच्या सव्वा दराने रेती विकली जाते. वाळू माफियांकडून होणारी सर्रास लूट पोलीस व महसूल रोखणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.

ओव्हरलोड रेतीसंदर्भात गठीत केलेल्या पथकाला कारवाईचे आदेश दिले आहेत.
- मदन जाधव,
तहसीलदार, अचलपूर

Web Title: Where is the lost revenue squad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.