बस कुठे अडकली, आधीच कळणार; ॲप लॉचिंग लांबणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:17 IST2021-08-24T04:17:46+5:302021-08-24T04:17:46+5:30

जितेंद्र दखने अमरावती : कोरोना काळात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस ...

Where the bus got stuck, already known; App launching delayed! | बस कुठे अडकली, आधीच कळणार; ॲप लॉचिंग लांबणीवर!

बस कुठे अडकली, आधीच कळणार; ॲप लॉचिंग लांबणीवर!

जितेंद्र दखने

अमरावती : कोरोना काळात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस कुठे आहे. त्याचे लोकेशन आता एका क्लिकवर मिळणार आहे. मात्र, या ॲपचा मुहूर्त सध्यातरी लांबणीवर पडल्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. रेल्वेप्रमाणेच प्रवाशांना आता एसटी बसचे लोकेशन आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. मात्र सध्या अमरावती विभागातील प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळत नाही.

बॉक्स

बस कुठे आहे हे आधीच कळणार

रेल्वे प्रमाणे जीएसटी बसचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना कळणार आहे. एवढेच नव्हे तर बस क्रमांकावरूनही लोकेशन कळणार आहे. या बसमध्ये व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम बसविली जाणार आहे.

बॉक्स

स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकला

गावांना जोडणारे एसटी बस ग्रामस्थ तसेच शहरवासीयांच्या जीवनाचा एक भाग आहे. प्रवास लांबचा असो की जवळचा प्रवासी सर्वप्रथम एसटी बसलाच प्राधान्य देतात. अनेकदा तासनतास बसची वाट पाहत प्रवासी ताटकळत बसत असल्यांचे चित्र नेहमी पाहावयास मिळते.

बॉक्स

प्रवाशांना दिलासा

या ॲपमुळे बसेस कोणत्या मार्गाने जाणार बस सुटण्याची वेळ विलंब होणार असल्यास अपेक्षित वेळ आधीची माहिती या ॲपव्दारे उपलब्ध होणार आहे. बसचा रिअल टाईम करणार असल्याने प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार आहे.

- श्रीकांत गभने,

विभाग नियंत्रक

बॉक्स

किती बसेसना बसविली यंत्रणा ?

अमरावती-६०

बडनेरा -४८

दर्यापूर -४६

चांदूरबाजार -४२

परतवाडा -५६

मोर्शी -३६

वरुड -४४

चांदुर रेल्वे - ३६

एकूण ३६८

Web Title: Where the bus got stuck, already known; App launching delayed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.