आदिवासींना कधी मिळणार आत्मसन्मान

By Admin | Updated: August 9, 2016 00:03 IST2016-08-09T00:03:15+5:302016-08-09T00:03:15+5:30

नोकरीत आरक्षण पण पदे रिक्त, आदिवासी गावांसाठी कोटींचा निधी. मात्र योजनेचा उडालेला बोजवारा, विद्यार्थ्यांना सायकल...

When will the tribals get self respect? | आदिवासींना कधी मिळणार आत्मसन्मान

आदिवासींना कधी मिळणार आत्मसन्मान

जागतिक आदिवासी दिन : बोली भाषा, संस्कृतीला मिळावे प्रोत्साहन
मोहन राऊत अमरावती
नोकरीत आरक्षण पण पदे रिक्त, आदिवासी गावांसाठी कोटींचा निधी. मात्र योजनेचा उडालेला बोजवारा, विद्यार्थ्यांना सायकल व कोंबड्या, बकऱ्यांच्या योजनेतून आदिवासींचा कितपत विकास झाला, असा सवाल मंगळवारी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे़
पंन्नास वर्षांपूर्वी १९२ देश एकत्रित येऊन निर्मित संयुक्त राष्ट्रसंघाने आपापल्या देशातील आदिवासींच्या विकासाचे वास्तव्य ९ आॅगस्ट १९९३ रोजी जाणून घेतले. आदिवासी समाज गरिबी, आरोग्य, बेरोजगारी, बालमजुरी, कुपोषण या समस्यांनी ग्रासल्याचे लक्षात आले.
सुविधांचा अभाव व अडचणीचा डोंगर
जिल्ह्यात आदिवासींची संख्या ही सर्वच तालुक्यात असली तरी चिखलदरा, धारणी या तालुक्यात अधिक आहे़ अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना आजही सायकल मिळत नसल्याने शाळेत पायदळ जावे लागते, न्युकलीयस बजेट योजनांतर्गत पंन्नास हजारपर्यंत वैयक्तिक लाभाची योजना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिली जाते. अनेक अर्ज संबंधित कार्यालयात धूळखात पडली आहेत़ किराणा दुकान, रसवंती, हॉटेल याकरिता पंन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान आदिवासींना देण्यात येते़ मात्र संबंधित योजनेचा लाभ केवळ दोन टक्के आदिवासींनाच होतो़ स्वांतत्र्य पूर्व काळापासून गोवारी ही जमात आदिवासी असताना शासनाच्या लालफीतशाहीमुळे न्याय हक्कापासून वंचित आहे़ मंगळवारला आदिवासी गोवारी शहीद स्मारक समिती सिताबर्डी नागपूरच्या वतीने जागतिक आदिवासी दिना निमीत्य आदिवासी संस्कृती दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले असून आदिवासी गोवारी नृत्य, दंडार, घोडा नृत्य, गोंडी नृत्य कलाकृती सादर करणार असल्याची माहिती दामोधर नेवारे यांनी दिली़

Web Title: When will the tribals get self respect?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.