शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाला नवे कुलगुरू केव्हा? नऊ महिन्यांपासून प्रभारी ‘राज’

By गणेश वासनिक | Updated: October 3, 2023 17:27 IST

निवड समितीचे कामकाज कासवगतीने; अर्ज मागविण्यासाठी जाहिरातीचा पत्ता नाही, शैक्षणिक- भौतिक विकासावर परिणाम

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाला नऊ महिन्यानंतरही कायमस्वरूपी कुलगुरू मिळाले नाही. त्यामुळे कारभार प्रभारी सुरू असून विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि भौतिक विकासावर गंभीर परिणाम होत आहे. मात्र या बाबीकडे पश्चिम विदर्भातील लोकप्रतिनिधी अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत.

तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे गंभीर आजाराने २८ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. तेव्हापासून अमरावती विद्यापीठाचा प्रभारी कारभार सुरु आहे. हल्ली नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार सांभाळत आहे. मात्र, नांदेड ते अमरावती असा सुमारे ५०० किमी. चा पल्ला गाठून कारभार हाताळणे डॉ. येवले यांना आता शक्य होत नसल्याचे चित्र आहे.

तर दुसरीकडे व्यवस्थापन परिषदेने नव्या कुलगुरू निवडीप्रक्रियेसंदर्भात समिती गठीत केली आहे. मात्र या समितीचे कामकाज फारच संथगतीने सुरु आहे. त्यामुळे यंदा तरी अमरावती विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळणार नाही, असे संकेत आहेत. विद्यापीठाशी सुमारे ४२५ संलग्नित महाविद्यालये आहेत. नऊ महिन्यांपासून कायमस्वरूपी कुलगुरू नसल्याने विद्यापीठासह महाविद्यालयांच्या विकासासाठी ही बाब मारक ठरणारी आहे. विद्यापीठाचे घसरलेले ‘नॅक’ कसे सुधारणार अशा अनेक विषयांवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.तीन महिन्यापासून जाहिरात प्रसिद्ध नाही

नवीन कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी समिती गठीत होऊन तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. नवीन कुलगुरू पदासाठी अर्ज मागविणे, जाहिरात प्रसिद्ध करणे, अर्जाची छाननी करणे, उमेदवारांच्या मुलाखती घेणे त्यानंतर पात्र पाच उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठविणे आदी प्रक्रिया या समितीलाच कराव्या लागते. साधारणत: या बाबीसाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. नोडल अधिकाऱ्यांची अगोदरच निवड झाली. पण आता ऑक्टोबर उजाडल्यानंतरही नवीन कुलगुरू पदासाठी जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने एकूणच प्रक्रिया ठप्प आहे.

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठAmravatiअमरावती