राज्यातील तहसीलदारांना कधी मिळणार न्याय

By Admin | Updated: July 22, 2014 23:47 IST2014-07-22T23:47:24+5:302014-07-22T23:47:24+5:30

सर्वाधीक महसूल देणाऱ्या महसूल विभागाचा केंद्र बिंदू असणाऱ्या तहसीलदारावर दिवसेंदिवस कामाचा बोझा वाढला असून आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल राज्यातील तहसीलदार यांनी केला आहे़

When will the tahsildars of the state get justice? | राज्यातील तहसीलदारांना कधी मिळणार न्याय

राज्यातील तहसीलदारांना कधी मिळणार न्याय

मोहन राऊत - अमरावती
सर्वाधीक महसूल देणाऱ्या महसूल विभागाचा केंद्र बिंदू असणाऱ्या तहसीलदारावर दिवसेंदिवस कामाचा बोझा वाढला असून आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल राज्यातील तहसीलदार यांनी केला आहे़
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात ८४ तहसीलदार कार्यरत आहेत़ राज्य शासनात असलेल्या विभागापैकी सर्वाधीक महसूल हा महसूल विभाग देतो़ तालुक्यातील सर्व गावांतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही तहसीलदारावर असते़ मागील वीस वर्षा पूर्वी केवळ महसूल मधील शेती संदर्भातील सातबारा, पेरे पत्रक महसूल दप्तर व अभीलेख, अपडेट ठेवण्याची महसूली कामे होती़ आता तब्बल साडेतीनशे कामाचा बोझा वाढला आहे़ तहसीलदारांच्या वाढत्या कामाकडे शासनाचे पुर्णत: दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तहसीलदार- नायब तहसीलदार संघटनेने केला आहे़आज पूर्ण दिवस जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलीअर, उत्पन्नाचा दाखले, अधिवास प्रमाणपत्र यावर स्वाक्षरी करण्यात जातो़ जिल्ह्याच्या ठिकाणी पुरवठा विभागाकरीता स्वतंत्र तहसीलदार म्हणून आहेत़ परंतू तालुकास्थळी पुरवठा विभागाची जबाबदारी तहसीदारावर आहे़ या विभागात कोणताही अपहार झाला तर तहसीलदाराला जबाबदार धरण्यात येते़ करमणुक कर, अतीवृष्टी धारकांना मदतीचे वाटप, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप व महसुल मधून येणारी शासकीय वसुली तसेच विविध विभागातून येणाऱ्या करांच्या हिशोबांचा लेखाजोखा तहसील कार्यालयातील लिपीकावर असतेक़ोट्यावधी रूपयांचा महसूल गोळा करणाऱ्या या कार्यालयाकरीता लेखापाल नसल्यामुळे कोणतीही चुक झाली तर तहसीलदाराला दोषी ठरविण्यात येते़ महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना ही राज्यात तहसील कार्यालयाच्या देखभालीत सुरू आहे़ कामाची मागणी केल्या नतर पंधरा दिवसात संबधीत मजूराला कामे उपलब्ध करून न दिल्यास भत्ता द्यावा लागते या रोहयो साठी स्वतंत्र अधिकारी नेमावा ही मागणी तहसीलदार संघटनेची धुळखात शासन दरबारी पडली आहे़ तहसील कार्यालयात कामे करतांना अनेकवेळा पक्षकार तहसीलदारांच्या अंगावर धावून येतात़ यावेळी वेळेवर पोलीस सरंक्षण मिळत नसल्याची खंत तहसीलदारांनी व्यक्त केली आहे़ मृत्यू पूर्व जबानी घेण्याची जबाबदारी तहसीलदारांवर आहे़ ही जबानी घेतल्या नंतर न्यायालयात चालणाऱ्या प्रकरणावेळी तहसीलदाराला वारंवार चकरा मारण्याचे काम करावे लागते़ लोकसभा निवडणूकीपासून तर ग्रामपंचायती निवडणूकी पर्यंत कामाचा व्याप तहसीलदारावर असते़ निवडणूकी प्रक्रीयेत योग्य निर्णय दिल्या नंतर ही एखाद्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला तर तहसीलदारावर वचपा काढण्याचे प्रकार विभागात घडले आहे ़
मुरूम ,रेती, गिट्टी, अवैद्य गौण खनिज चोरणाऱ्यांना आळा घालतांना तहसीलदारावर अनेक वेळा प्राणघातक हल्ले झाले आहेत क़ामाच्या वाढत्या व्यापामुळे तहसीलदारावर मानसिक ताण वाढला आहे़ मानसिकताण कमी करण्याकरीता एक अतिरीक्त तहसीलदार नेमण्यात यावे, अशी मागणी तहसीलदार संघटनेने केली आहे़

Web Title: When will the tahsildars of the state get justice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.