‘प्रियदर्शनी’चा घोळ निस्तरणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 06:00 AM2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:01:14+5:30

विकासक वासुदेव खेमचंदानी यांचेसोबत महापालिकेने येथील जयस्तंभ चौकातील १३६२.५० चौ.मी जागेवर व्यापारी संकुल बांधण्याकरिता करारनामा केला होता. या संकुलातील गाळ्यांचे वाटप २५ वर्षांकरिता विकासक करेल व त्याचे भाडे १ रुपया चौरस फूट प्रतिमाह असेल. याविषयी महापालिकेने १ एप्रिल १९९३ रोजी गाळे वाटपाच्या अनुषंगाने करारनामा केला.

When will 'Priyadarshani' slip away? | ‘प्रियदर्शनी’चा घोळ निस्तरणार केव्हा?

‘प्रियदर्शनी’चा घोळ निस्तरणार केव्हा?

Next
ठळक मुद्देधोरणात्मक निर्णय हवा : महापालिकेच्या सर्व संकुलांना एकच न्याय का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहराच्या मध्यवस्तीतील जयस्तंभ चौकात असलेल्या प्रियदर्शनी मार्केटचे भाडे निश्चित करताना अटकाव होत आहे. यामुळे निर्र्माण होणारे तांत्रिक पेच महापालिका प्रशासनाला गुंतागुंतीचे ठरत आहे. उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करण्यासाठी महापालिका प्रशासनाने दबाव झुगारण्याची गरज आहे.
विकासक वासुदेव खेमचंदानी यांचेसोबत महापालिकेने येथील जयस्तंभ चौकातील १३६२.५० चौ.मी जागेवर व्यापारी संकुल बांधण्याकरिता करारनामा केला होता. या संकुलातील गाळ्यांचे वाटप २५ वर्षांकरिता विकासक करेल व त्याचे भाडे १ रुपया चौरस फूट प्रतिमाह असेल. याविषयी महापालिकेने १ एप्रिल १९९३ रोजी गाळे वाटपाच्या अनुषंगाने करारनामा केला. ही मुदत संपुष्टात आल्याने नव्याने करारनामा करण्याबाबतचा विषय आला. महापालिकेने सध्याच्या रेडीरेकनरनुसार करारनामा करण्यास सुचविले असता विकासक व गाळेधारकांनी नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांकडे अपील केली होती.
नगरविकास राज्यमंत्र्यांनी दुकानदारांचा प्रस्ताव प्राप्त करून प्रकरणातील यापूर्वीचे करारनामे, कायदे व नियमातील तरतुदी व प्राप्त प्रस्ताव तपासून नव्याने कारवाई करावी व आवश्यकतेनुसार शासनाचे मार्गदर्शन घ्यावे, असे निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने दुकानदारांचा प्राप्त प्रस्ताव प्रथम स्थायी समितीकडे आला. त्याला ७७४ रुपये चौरसमीटर दराप्रमाणे मंजुरी देण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव १६ नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेसमोर आला असताना अपवाद वगळता बहुतेक सदस्यांनी याला कडाडून विरोध केल्याने महापालिका प्रशासनाने ठाम भूमिका घेणे महत्त्वाचे आहे.

उत्पन्नाचे स्रोत बळकट केव्हा करणार?
महापालिकेचे शहरात २७ व्यापारी संकुल आहेत. महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोतापैकी हा एक स्त्रोत आहे. त्यामुळे विशेष अनुदानावर विसंबून न राहता महापालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करावे लागणार आहे. त्यामुळे इतर व्यापारी संकुलास जो न्याय, तोच न्याय आता प्रियदर्शनी संकुलास लावावा, ही नगरसेवकांची मागणी रास्त आहे. यासाठी महापालिकेनेही आता कुठल्याही दबावाला न जुमानता उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करण्याची गरज आहे.

जुन्या ठरावाचे विखंडन महत्त्वाचे
गाळेधारकांनी नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे अपील केल्यानंतर यापूर्वीच्या २६ सप्टेंबर २०१७ च्या बैठकीत झालेला ठराव विखंडित करण्यासाठी आयुक्तांनी शासनाकडे पाठविलेला आहे. तत्कालीन अधीक्षकांनी पुढील २५ वर्षांकरिता १ रुपया चौरस फुटाप्रमाणे दर महापालिकेच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मत आयुक्तांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

या व्यापार संकुला संदर्भात शासनाचे मत मागविले आहे. तोवर थांबवावे लागणार आहे. त्यानंतर धोरणात्मक निर्णय घेऊ. हा विषय बरेच दिवसांपासून प्रलंबित आहे. लवकरच निकाली काढू.
- चेतन गावंडे,
महापौर

Web Title: When will 'Priyadarshani' slip away?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.