बँकेसमोरची अस्ताव्यस्त वाहतूक केव्हा हटणार ?
By Admin | Updated: July 22, 2016 00:34 IST2016-07-22T00:34:49+5:302016-07-22T00:34:49+5:30
येथील वर्दळीच्या मार्गावर असणाऱ्या भारतीय स्टेट बॅँकेसमोर सर्रास रस्त्यावरच दुचाक्या चारचाकी गाड्या उभ्या राहत असल्याने .....

बँकेसमोरची अस्ताव्यस्त वाहतूक केव्हा हटणार ?
बँक प्रशासनाचे दुर्लक्ष : अपघाताची शक्यता
बडनेरा : येथील वर्दळीच्या मार्गावर असणाऱ्या भारतीय स्टेट बॅँकेसमोर सर्रास रस्त्यावरच दुचाक्या चारचाकी गाड्या उभ्या राहत असल्याने सुरळित वाहतुकीला मोठा अडसर निर्माण होत आहे. बॅँक प्रशासनाने याकडे लक्ष पुरविण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही.
तळ्यावस्तीच्या चांदणी चौकालगत भारतीय स्टेट बॅँकेची इमारत आहे. ज्या भागात ही बॅँक आहे तेथून रेल्वे स्टेशन जवळ आहे. लागूनच वस्ती आहे. रेस्टहाऊस तसेच शाळा महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅँक असल्यामुळे येथून वाहतुकीची मोठी वर्दळ असते. या बॅँकेचे मोठ्या संख्येत खातेदार आहे. पर्यायाने बॅँकेसमोर दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची येथे रांग असते. बॅँकेत येणाऱ्या ग्राहकांना नाईलाजास्तव वाहन रस्त्यावरच उभे करावे लागते. बॅँक प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे वाहतुकीच्या रस्त्यावरच वाहनांचा बोजवारा सुरळीत वाहतूकदार तसेच पायदळ चालणाऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. बॅँकेसमोर खुली जागा आहे. मात्र वाहनचालकांना तशी व्यवस्थाच केलेली नाही. या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांत बॅँक प्रशासनाबाबत रोष व्यक्त केल्या जात आहे. बॅँकेच्या खुला जागेतच ग्राहकांच्या गाड्या लावण्याचे नियोजन करण्यात यावे. ज्यामुळे हा रस्ता मोकळा राहील व सुरळीत वाहतुकदारांना नाहक मन:स्ताप सहन करण्याची वेळ येणार नसल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. एक लाख लोकवस्तीच्या बडनेरा शहरासह परिसरातील बऱ्याच खेड्यांवरील नागरिक या बॅँकेचे खातेदार आहे. येथे ग्राहकांची गर्दी असते. पार्किंग व्यवस्थेसह बॅँकेत खातेदारांना बसण्याची व्यवस्थासुद्धा नाही. तासन्तास ग्राहक ताटकळत उभे राहतात. दोन्ही बाबींची व्यवस्था करण्यात यावी, असे बोलल्या जात आहे. (श.प्र.)