शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आशांना कधी मिळणार कामाचा मोबदला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 13:13 IST

Lok Sabha Election 2024 : निवडणूक प्रक्रियेत सर्वाधिक सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे: लोकसभा निवडणुकीत आजच्या मतदानाच्या वेळी आशा वर्कर्सनी दिवसभर मतदान केंद्रांवर काम केले असताना या आशांना निवडणूक कामाचा मोबदला मिळालेला नाही. जिल्ह्यातील दीड हजार आशा वर्कर्समध्ये यामुळे असंतोष पसरला आहे

अमरावती व वर्धा लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. ग्रामीण भागातील या मतदान केंद्रावर आवश्यक मदतीसाठी आशा वर्कर्सची नेमणूक करण्यात आली होती. आशा वर्कर्सनी तापत्या उन्हात कामे केली. वृद्ध मतदारांना मतदान केंद्रात घेऊन जाणे, गर्भवती महिला मतदारांना मतदान केंद्रात नेण्यासाठी या आशांनी पुढाकार घेतला. एवढेच नव्हे, तर कडेवर लहान मूल घेऊन आलेल्या महिला मतदारांच्या जवळील या मुलांचा काही वेळ सांभाळ केला. 

एकीकडे मतदान केंद्रावर काम करणाऱ्या कोतवाल तसेच शिपायाला निवडणुकीचा भत्ता देण्यात येतो. निवडणुकीचे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना भत्ता द्यावा, असे शासनादेशात नमूद असताना जिल्ह्यातील दीड हजार आशा वर्कर्सना निवडणुकीचा कामाचा मोबदला अद्यापही मिळाला नाही. किमान केलेल्या कामाचा विचार प्रशासनाने करावा, अशी मागणी होत आहे.

दर निवडणुकीत आम्ही इमाने-इतबारे कामे करतो. मात्र, आम्हाला कोणतेही मानधन तथा मोबदला देण्यात येत नाही. निवडणूक विभागाने आमचा सकारात्मक विचार करावा.- शुभांगी चौधरी, माजी तालुकाध्यक्ष, आयटक (धामणगाव रेल्वे)

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ElectionनिवडणूकVotingमतदानlok sabhaलोकसभा