शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

वडाळी तलाव गाळमुक्त केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 1:29 AM

शहरालगतच्या ब्रिटिशकालीन वडाळी तलावात प्रमाणापेक्षा अधिक गाळ साचल्याने कधी न दिसलेली तलावातील जमीन आता उघडी पडू लागली आहे. या ऐतिहासिक तलावाला दोन तलावांची साथ असल्याने पाण्याचा ‘फ्लो’ कायम आहे.

ठळक मुद्देजलस्तर कमी, मृतसाठा वाढतोय : महापालिका उद्यान विभागाचे दुर्लक्ष

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरालगतच्या ब्रिटिशकालीन वडाळी तलावात प्रमाणापेक्षा अधिक गाळ साचल्याने कधी न दिसलेली तलावातील जमीन आता उघडी पडू लागली आहे. या ऐतिहासिक तलावाला दोन तलावांची साथ असल्याने पाण्याचा ‘फ्लो’ कायम आहे. मात्र, तलावाची खोली गाळाने भरल्यामुळे मृतसाठाच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे अवघ्या महिनाभरात हा तलाव कोरडा पडण्याचे संकेत मिळू लागले आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात उमरावती नावाने ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहराला याच वडाळी तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. हा ऐतिहासिक तलाव असून, याला 'सपोर्ट' म्हणून त्याचेही वर दोन तलावांची ब्रिटिश शासनाने निर्मिती केली होती. त्यामुळे वडाळी तलावावर तळ गाठण्याची वेळ कधीच आली नव्हती. ब्रिटिशांनी या तलावाची निर्मिती तंत्रशुद्ध पद्धतीने केली असून, शहराला पाणीपुरवठा ‘ग्रेव्हीटी’ पद्धतीने होत होता. मात्र, वाढती लोकसंख्या व शहरीकरणाचा व्याप पाहता तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात सिंभोरा धरणाची निर्मिती झाली. तेव्हापासून या तलावाचा होणारा पाणीपुरवठा थांबला. परंतु सद्यस्थितीत या तलावाच्या भरवशावर दोन पर्यटन स्थळे निर्माण करण्यात आली आहेत. वडाळी गार्ड व बांबू गार्डन अशी या प्रसिद्ध पर्यटन स्थळांनी नावे होत. अमरावतीकरांना शिण घालवण्यासाठी वा मनमोकळेपणाने पक्ष्यांचा मनाला आनंद देणारा आवाज ऐकण्यासाठी हे पूरक असून, येथे विद्यार्थ्यांसह वृद्धांची मोठी आवक असते. परंतु, ज्या तलावाच्या पाण्यावर हे पर्यटन स्थळ फुलले तेथे पाणीच शिल्लक राहणार नसेल तर येथील हिरवळ कशी बरी जिवंत राहील, असा सवाल आता नागरिकांना सतावत आहे. या समस्येवर मात करणे तेव्हाच शक्य होईल, जोपर्यंत तलावातील गाळ व वनस्पती काढली जाणार नाही, हे वास्तव आहे. या तलावाचे खोलीकरण याच महिन्यात केल्यास ते सोयीचे तर होणार असून, यापुढेही पाण्याची तमतरता भासणार नाही. यासंदर्भात महापालिकेचे शहर अभियंता जीवन सदार यांचेशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.ब्रिटिशकालीन चिमणी बंदावस्थेतवडाळी तलाव हे शहरालगतच असून, त्यातील पाणी शहराच्या मध्यभागातून जाणाºया अंबानाल्यातून वाहते. त्यामुळे तलाव फुटल्यास शहराला धोका संभवतो. याबाबत सतर्कता म्हणून ब्रिटिश शासनाने तंत्रशुद्ध पद्धतीने त्याची निर्मिती केलेली आहे. जेव्हा पाण्याची पातळी वाढेल तेव्हा तेथे बसविलेल्या लोखंडी खांबावरील चिमणीतून पाण्याची धार वाहायला लागायची. अशा वेळी तलावाने धोक्याची पातळी गाठल्याचे लक्षात यायचे. त्यामुळे नालाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला जायचा. मात्र, ती चिमणी कित्येक वर्षांपासून बंदावस्थेत असताना महापालिका उद्यान विभाग याकडे अजिबात लक्ष देत नसल्याचे निदर्शनास आले आहे.हा तलाव दोन्ही पर्यटन स्थळांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या महिन्यात गाळ काढणे शक्य आहे. पुढे धोकादेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- अशोक बुंधे,व्यवस्थापक, वडाळी गार्डनसदर कार्य शहर अभियंता व बांधकाम विभागांतर्गत येत असून, वडाळी गार्डन बीओटी तत्त्वावर दिलेले आहे.- प्रमोद येवतीकर,उद्यान अधीक्षक, महापालिका