सागवान कटाईप्रकरणी कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:01 IST2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:01:05+5:30

शेख बशीर शेख लाल यांनी या शेतीबाबत धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे बोगस फेरफाराची चौकशी करून मूळ मालकास जमीन परत नावावर करण्याचे आदेश देण्याबाबत प्रकरण दाखल केले. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात अंतिम आदेश पारित होणे बाकी आहे. तत्पूर्वी, तक्रारदार व मूळ मालक शेख बशीर शेख लाल यांनी या शेतामधील १९ सागवान झाडे अवैधरीत्या कापून विकल्याप्रकरणी तक्रार केली होती.

When to take action in teak harvesting case? | सागवान कटाईप्रकरणी कारवाई केव्हा?

सागवान कटाईप्रकरणी कारवाई केव्हा?

ठळक मुद्देतलई येथील प्रकरण : उपवनसंरक्षकांच्या आदेशाने पंचनामा

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : शहराला लागून असलेल्या अमरावती-बºहाणपूर मुख्य मार्गावरील तलई या गावातील बहुचर्चित सर्व्हे नंबर ३५ ब या १ हेक्टर ६२ आर शेतातील अवैध सागवान वृक्षकटाईचा पंचनामा ३ जुलै रोजी झाला. याकरिता तक्रारदार शेख बशीर शेख लाल यांना वारंवार परतवाडा स्थित पश्चिम मेळघाट उपवनसंरक्षक कार्यालयाचे उंबरठे झिजवले लागले. अखेर उपवनसंरक्षकांच्या १७ जून २०२० रोजीच्या पत्रान्वये वर्तुळ अधिकारी जी.एस. चव्हाण यांनी पंचनामा केला. आता याप्रकरणी कारवाईची प्रतीक्षा आहे.
शेख बशीर शेख लाल यांनी या शेतीबाबत धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे बोगस फेरफाराची चौकशी करून मूळ मालकास जमीन परत नावावर करण्याचे आदेश देण्याबाबत प्रकरण दाखल केले. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात अंतिम आदेश पारित होणे बाकी आहे. तत्पूर्वी, तक्रारदार व मूळ मालक शेख बशीर शेख लाल यांनी या शेतामधील १९ सागवान झाडे अवैधरीत्या कापून विकल्याप्रकरणी तक्रार केली होती. वनविभाग कोणती कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

वृक्षतोडीची परवानगी नाही
धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने साग तोडण्याची परवानगी दिली होती किंवा कसे, याबाबत माहितीच्या अधिकारान्वये शेख बशीर शेख लाल यांनी पत्र दिले होते. त्यांना १३ नोव्हेंबर २०१९ रोजी या कार्यालयामार्फत वृक्षतोडीची परवानगी देण्यात आली नसल्याचे पत्र देण्यात आले होते. त्यानंतर शेख बशीर शेख लाल यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी, याकरिता उपविभागीय अधिकारी आणि वनविभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला होता.

Web Title: When to take action in teak harvesting case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.