अवैध शिकवणी वर्गांवर कारवाई केव्हा ?

By Admin | Updated: July 21, 2016 00:02 IST2016-07-21T00:02:24+5:302016-07-21T00:02:24+5:30

शिक्षण विभागाच्या ढीसाळ कारभारामुळे अमरावती जिल्हयात अवैध शिकवणी वर्ग फोफावले आहे.

When to take action against illegal teaching classes? | अवैध शिकवणी वर्गांवर कारवाई केव्हा ?

अवैध शिकवणी वर्गांवर कारवाई केव्हा ?

नियमांची ऐसीतैसी : बिनदिक्कत शिकवणी वर्ग सुरु
अमरावती : शिक्षण विभागाच्या ढीसाळ कारभारामुळे अमरावती जिल्हयात अवैध शिकवणी वर्ग फोफावले आहे. शासकीय सेवेत असलेले शिक्षकच शिकवणी वर्ग घेत असल्यामुळे शासकीय शिक्षकांनी अवैधरित्या कोट्यावधींची माया जमविली आहे. या शिक्षकांवर कारवार्इंचा बडगा केव्हा असा प्रश्न विचारला जात आहे.
शासकीय शिक्षक विद्यार्थ्यांना व पालकांना आपल्या पाल्यांना प्रात्याक्षिक परीक्षेत चांगले गुण देण्यात येतील असे आमीष दाखविले जाते.
जर आमच्याकडे शिकवणी वर्ग लावला नाही तर, शैक्षणिक नुकसान करु अशी धमकीच त्यांना देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ईच्छा नसतानाही आपले शैक्षणीक नुकसान होऊ नये या भितीपोटी संबधित शाळेतील विषय शिक्षकांकडेच शिकवणी वर्ग नाईलाजाने लावावे लागते. अनेक सुशिक्षीत बेरोजगार शिक्षकांना सर्वत्र सुरु असलेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे शासकीय नोकऱ्या मिळत नाही. शासकीय नोकरीत असलेले शिक्षकच विद्यार्थी आपल्याकडे अडवून धरतात त्यामुळे बेरोजगार शिक्षकांना पाहिजे तेवढे विद्यार्थी मिळत नाही. बेरोजगार शिक्षकांकडे पाहिजे तेवढी शैक्षणीक पात्रता असतांनाही व गुणवत्ता असतानाही सर्वत्र सुरु असलेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे त्यांना नोकरीसाठी भटकावे लागते
त्यामुळे असे शिक्षक बाहेर खासगी शिकवणी वर्ग घेऊन आपला उदरनिर्वाह करतात. बेरोजगार शिक्षकांना शिकवणी वर्गांच्या माध्यमातून रोजगार मिळावा यासाठी शासनाने सन २००० व २०१४ शासन निर्णय काढून शासकीय सेवेत असलेल्या कुठल्याही शिक्षकांनी शिकवणी वर्ग घेऊ नये व घेतल्यास त्यांच्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई करावी असे स्पष्ट आदेश असताना शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे कारवाया होत नाही. आतापार्यंत गेल्या दोन- तीन वर्षात शिक्षणाधिकाऱ्यांनी एकही धाड टाकून कारवाई केली नाही. आम्हाला शिकवणी वर्ग घेणारे शिक्षक दाखवा आम्ही कारवाई करतो. असा उलट सवाल ते करतात. नियमांचे पालन व्हावे, शासनाच्या कुठल्याही शासन निर्णयाची पायमल्ली होऊ याची खबरदारी घेण्याचे काम प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षणाधिकाऱ्यांचे असते. परंतू या नियमांचे पालन होताना कुठेही दिसून येत नाही. खासगी शिकवणी वर्गांच्या संचालकांचे व शिक्षणविभागाच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे तर नाही ना असे आता शिक्षणक्षेत्रात उघडपणे चर्चा होत आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवार्इंचा बडगा उगारावा अशी मागणी होत आहे.
शहरात अवैध शिकवणी वर्ग फोफावल्याने सर्वत्र विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची लुट चालू आहे. शासकीय सेवेत असलेले शिक्षक विद्यार्थ्यांना व पालकांना शिकवणी वर्गाची कुठलीही पावती देत नाही. त्यामुळे या शिकवणी वर्गाची अधिकृत कुठेही नोंदच नसल्याने आयकर सुध्दा ते बुडवितात. त्यामुळे अशा शिक्षकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)

शिकवणी चालकांची फुटापाथवर अवैध पार्किंग
शहरातच अवैध शिकवणीवर्ग फोफावले आहे. खासगी शिकवणी चालकाही नियमांचे कुठलेही पालन करीत नाही. विद्यार्र्थींकडुन शिकवणी लावण्यासाठी लाखो रुपयांचे शिकवणी शुल्क घेतल्या जाते. मात्र त्यांना कुठलीही सुविधा देण्यात येत नाही. गाडगेनगरात सर्वाधिक शिकवणी वर्ग असून महापालिकेचे फुटपाथवर राजोरोसपणे शिकवणी वर्गांच्या विद्यार्थ्यांच्या सायकली व दुचाकी ठेवण्यात येतात. यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत असून लोकांना सुरक्षित चालता यावे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन महापालिकेने फुटपाथ केले आहे. पण शिकवणी वर्गांचे चालक याचा गैरवापर करीत आहे.

कारवाई करण्यासाठी एक पथक गठीत केल्या जाईल. त्यासाठी शिक्षण विभागाची यंत्रणा कामी लागली आहे. शाळांच्या मुख्यध्यापकांशीही यासंदर्भात चर्चा करण्यात येईल.
सी. आर. राठोड
शिक्षणाधिकारी, माध्यमिक , अमरावती.

Web Title: When to take action against illegal teaching classes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.