शालेय क्रीडा स्पर्धा केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST2021-02-05T05:22:22+5:302021-02-05T05:22:22+5:30
मोर्शी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन उठवल्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार २३ डिसेंबरपासून वर्ग नववी ते बारावी तसेच २७ जानेवारीपासून पाचवी ...

शालेय क्रीडा स्पर्धा केव्हा?
मोर्शी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन उठवल्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार २३ डिसेंबरपासून वर्ग नववी ते बारावी तसेच २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. आता सत्रातील शालेय क्रीडा स्पर्धा केव्हा सुरू होतील, याची विद्यार्थी, खेळाडू, शारीरिक शिक्षण शिक्षक, क्रीडा प्रशिक्षकांना उत्सुकता आहे. या संपूर्ण स्पर्धा त्वरित सुरू करण्याची मागणी
होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या २० जानेवारीच्या परिपत्रकानुसार, क्रीडा स्पर्धा आयोजनाला परवानगी देण्यात आली असली तरी अजूनपर्यंत शालेय क्रीडा स्पर्धा सुरू न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पालक, शिक्षक, संस्थाचालक, प्रशासन यांच्या समन्वयाने होत असलेल्या सुयोग्य प्रयत्नाने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती फोल ठरली. अशावेळी पुढील काही आठवड्यांत राज्याच्या शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी क्रीडा विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्थानिक शिवाजी शाळेचे शारीरिक विषय शिक्षक श्रीकांत देशमुख यांनी केली आहे.