कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST2021-02-09T04:14:45+5:302021-02-09T04:14:45+5:30

एका पॉझिटिव्हमागे ३० टेस्टिंगचा निकष, आरोग्य विभागाची बोंब अमरावती : दहा दिवसांत वाढलेल्या संसर्गामुळे रुग्ण पॉझिटिव्हिटी दर तीन महिन्यांनंतर ...

When to increase contact tracing? | कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणार केव्हा?

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणार केव्हा?

एका पॉझिटिव्हमागे ३० टेस्टिंगचा निकष, आरोग्य विभागाची बोंब

अमरावती : दहा दिवसांत वाढलेल्या संसर्गामुळे रुग्ण पॉझिटिव्हिटी दर तीन महिन्यांनंतर आता दरदिवशी १५० ते २०० वर पोहोचला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी एका पॉझिटिव्ह रुग्णामागे किमान ३० कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व तेवढ्याच चाचण्यांचे लक्ष्यांक केंद्र शासनाच्या आरोग्य सचिवांनी दिले आहे. त्याकडे आरोग्य यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्यानेही संसर्ग वाढला आहे.

जिल्ह्यात दिवाळीपश्चात कोरोनाचा संसर्ग वाढेल, डिसेंबरपश्चात कोरोनाची दुसरी लाट येईल, असा आरोग्य यंत्रणेचा कयास होता. यातून जिल्हा बऱ्यापैकी वाचला. मात्र, त्यानंतर जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यात. यासाठी १२ हजार मनुष्यबळ तैनात झाले. जिल्ह्याच्या तीन चतुर्थांश भागातील या रणधुमाळीपश्चात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.

निवडणूक प्रक्रियेत कुठेही कोरोना प्रतिबंमधक उपाययोजनांचे पालन झाले नाही, सर्व काही कागदावरच राहीले. याशिवाय संसर्ग कमी झाल्याच्या आनंदात नागरिकही कोरोनाला विसरले. चेहऱ्यावरचा मास्क जवळजवळ गायबच झाला. कुठेही जा, फिजिकल डिस्टन्सचा बोऱ्या वाजल्याचेच चित्र तेव्हापासून आहे. सॅनिटायझरही जवळजवळ नाहीच. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढला नसता, तरच नवल ठरले असते.

महापालिका क्षेत्रात कोरोनाने १५ हजार रुग्णसंख्या पार केली आहे. जवळजवळ सर्वच भागात कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. कंटेनमेंट झोन नावालाही नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्षच आहे. सुपर स्पेडर बिनधास्त फिरत आहेत. त्यांना कुठेही अटकाव नाही. चाचण्यादेखील कमी झाल्या आहेत. आरोग्य यंत्रणा ढिम्म झाली आहे. अशा या बेदरकारपणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे.

बॉक्स

चार हजार चाचण्यांची लक्ष्यांकपूर्ती केव्हा?

गणेशोत्सवानंतर राज्यात कोरोना वाढला होता. हे लक्षात घेऊन दिवाळीनंतरही कोरोनाचा संसर्ग वाढणार, असे लक्षात आल्याने राज्याच्या आरोग्य संचालकांनी दिवसाला चार हजार चाचण्यांचे लक्ष्यांक जिल्ह्यास दिले होते तसेच जानेवारीपश्चात दुसऱ्या लाटेचा अलर्टही दिला होता. याकडे झालेले दुर्लक्ष आता अंगलट येत आहे. जिल्ह्यात एक हजारांवर कधी चाचण्या झालेल्या नाहीत.

बॉक्स

आरटी-पीसीआर ७०,अ‍ॅन्टिजेनच्या ३० टक्के चाचण्या कुठे?

कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आरटी-पीसीआरच्या ७० टक्के व रॅपिड अ‍ॅन्टिजेनच्या ३० टक्के चाचण्या करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहे. मुळात चाचण्याच कमी होत आहेत. याबाबत नागरिक अनुत्सुक असल्याचा आरोग्य विभागाचा आरोप आहे. मात्र, हाय रिस्कच्या रुग्णापर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचत नसल्याचेही वास्तव आहे.

-----------------

जिल्हाधिकारी, महापालिका आयुुक्त ‘अ‍ॅक्शन मोड’वर

महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि आयुक्त प्रशांत रोडे आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. सोमवारपासून जिल्हा प्रशासनाची २० आणि महापालिकेची पाच पथके दंडात्मक कारवाईसाठी महापालिका क्षेत्रात नियुक्त करण्यात आली आहेत. मात्र, पथकानेही तेवढेच गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

कोरोनाची जिल्हास्थिती

०००००००

००००००००००००

०००००००००००००००

०००००००००००००००

Web Title: When to increase contact tracing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.