पीएम आवास घरकुल योजनेतील तिसऱ्या टप्प्याचा निधी केव्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST2021-05-07T04:13:05+5:302021-05-07T04:13:05+5:30
चांदूर रेल्वे : पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधीसाठी आम आदमी पार्टीकडून नगर परिषदेवर ताला ठोको आंदोलन ...

पीएम आवास घरकुल योजनेतील तिसऱ्या टप्प्याचा निधी केव्हा
चांदूर रेल्वे : पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधीसाठी आम आदमी पार्टीकडून नगर परिषदेवर ताला ठोको आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान आश्वासन दिल्यानंतर काही दिवसांतच दुसऱ्या टप्प्यातील निधी लाभार्थ्यांना मिळाला होता. आता तिसऱ्या टप्प्याच्या निधीसाठीसुध्दा लाभार्थ्यांना न. प. कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मागणीनुसार तिसऱ्या टप्प्याचा निधीसाठी पुन्हा आम आदमी पार्टी मैदानात उतरली आहे. तत्काळ निधी न मिळाल्यास १५ मे नंतर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
चांदूर रेल्वे नगर परिषद अंतर्गत पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम सुरू असताना आता तिसऱ्या टप्प्यातील निधी न आल्यामुळे ठप्प पडले आहे. दोन महिने उलटून गेल्यावरही निधी न मिळाल्यामुळे तिसरा टप्पा कधी पर्यंत मिळेल, असा प्रश्न मुख्याधिकाऱ्यांसमक्ष उपस्थित करण्यात आला. १५ मे पर्यंत लाभार्थ्यांना कोणत्याही आंदोलनाशिवाय हा टप्पा मिळायला पाहिजे, असे निवेदन आपचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री नितीन गवळी तसेच मेहमूद हुसेन, चरण जोल्हे, पंकज गुुडधे यांनी दिले आहे.