विद्यापीठाच्या ट्यॅब्युलेशन रजिस्टरचे डिजिटायझेशन केव्हा?
By Admin | Updated: July 15, 2014 23:52 IST2014-07-15T23:52:40+5:302014-07-15T23:52:40+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील ट्यॅब्युलेशन रजिस्टरची वयोमर्यादा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे रजिस्टरवरील निकालाच्या नोंदीचे डिजिटायझेशन करणे आता आवश्यक झाले आहे.

विद्यापीठाच्या ट्यॅब्युलेशन रजिस्टरचे डिजिटायझेशन केव्हा?
वैभव बाबरेकर - अमरावती
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील ट्यॅब्युलेशन रजिस्टरची वयोमर्यादा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे रजिस्टरवरील निकालाच्या नोंदीचे डिजिटायझेशन करणे आता आवश्यक झाले आहे. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या केवळ चर्चा सुरु असल्यामुळे संगणकीय प्रणालीचे काम अद्यापही थंडबस्त्यात आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातंर्गत ४१२ महाविद्यालयाचा समावेश असून त्यामध्ये लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा लेखाजोखा विद्यापीठाकडे अद्याप सुरक्षित आहे. विद्यार्थ्यांंच्या निकालाचा लेखाजोखा ठेवण्याकरिता विद्यापीठाकडे ट्यॅब्युलेशन रजिस्टर आहे. त्यामध्ये दरवर्षी निकालाच्या नोंदी घेण्यात येतात. सन १९९४ पासून या ट्यॅब्युलेशन रजिस्टरचे विद्यापीठाने जतन करुन ठेवले आहे. हे काम साभांळण्याकरिता विद्यापीठाकडे विशेष कक्ष आहे. मात्र आता ट्यॅब्युलेशन रजिस्टर खराब होण्याच्या मार्गावर असून विद्यापीठ प्रशासनाला डिजिटायझेशन करण्याची नितांत गरज निर्माण झाली असताना संगणकीय प्रणालीबाबत विद्यापीठात केवळ चर्चाच सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.