एमआयडीसीत स्थानिक युवकांना प्राधान्य केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 21:54 IST2018-03-27T21:54:36+5:302018-03-27T21:54:36+5:30

नांदगावपेठ एमआयडीसीत तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजूर केलेल्या एमओयू कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य नाही. जिल्ह्यातील युवकांना केवळ कंत्राटी स्वरूपात नोकरी देण्यात येत आहेत.

When did local youth get priority in MIDC? | एमआयडीसीत स्थानिक युवकांना प्राधान्य केव्हा?

एमआयडीसीत स्थानिक युवकांना प्राधान्य केव्हा?

ठळक मुद्देयशोमती ठाकूर सभागृहात कडाडल्या : ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या भूलथापा

आॅनलाईन लोकमत
अमरावती : नांदगावपेठ एमआयडीसीत तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजूर केलेल्या एमओयू कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य नाही. जिल्ह्यातील युवकांना केवळ कंत्राटी स्वरूपात नोकरी देण्यात येत आहेत. ‘मेक इन इंडिया’ व ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांना भूलथापा मिळत आहेत, असा घणाघाती हल्ला आ. यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी विधानसभेत सरकारवर केला.
विधानसभेत आ. यशोमती ठाकूर यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले. महिलांवरील अत्याचार, बलात्कार वाढले आहेत. राज्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याची २९६२ प्रकरणे आहेत. गृह विभागाचाच हा चिंताजनक अहवाल असला तरी त्यावर प्रतिबंधक उपाययोजना झालेल्या नाहीत. अवैध गोरक्षण, गोमांस, गोवंशाचा अवैध व्यापार, गाईच्या नावावर जातीचे राजकरण याकडे सरकार डोळेझाक करीत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील मिलिंद एकबोटे वगळता भिडे गुरुजी खुलेआम फिरत असून, त्यांना अटक झालेली नाही. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर परिसर व तिवसा बॉर्डरवरून वर्धा जिल्ह्यात खुलेआम दारूविक्री व तस्करी सुरू आहे. त्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय पूर्णानगर व कौंडण्यपूर येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, कुºहा येथे ग्रामीण रुग्णालयाला मान्यता तसेच तिवसा येथील नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर युनिटला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन रिक्त पदे मंजूर करण्याबाबत विनंती वजा पत्र त्यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना दिले आहे.
वलगाव सरपंच हत्याप्रकरणी आरोपींना अटक केव्हा?
वलगावचे माजी सरपंच अब्दुल करीम (कम्मू भाई) यांच्या खुनाच्या आरोपींना अजून अटक झालेली नाही, नांदगाव खंडेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ता व शिक्षिका कविता इंगोले (कटकतलवारे) व नुकतेच शीतल पाटील यांच्या खुनातील आरोपी नाट्यमयरीत्या अटक होतात. सोशल मीडिया, सायबर क्राइम व फेसबूकवरील आक्षेपार्ह, अनैतिक पोस्ट, हॅकिंग याबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक होत नसल्याबाबत आ.ठाकूर यांनी शासनाचे लक्ष्य वेधले

Web Title: When did local youth get priority in MIDC?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.