हॉटेलमधील पाण्याच्या नमुन्याची तपासणी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:35 IST2017-08-11T23:34:56+5:302017-08-11T23:35:45+5:30

शहरातील काही हॉटेलमध्ये नागरिकांना दूषित पाणी देण्यात येते.

When to check the water samples in the hotel? | हॉटेलमधील पाण्याच्या नमुन्याची तपासणी केव्हा?

हॉटेलमधील पाण्याच्या नमुन्याची तपासणी केव्हा?

ठळक मुद्देएफडीए झोपेत : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील काही हॉटेलमध्ये नागरिकांना दूषित पाणी देण्यात येते. यावर कुणाचेही नियंत्रण नसून एफडीएने विशेष मोहीम राबवून पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यास दूषित पाणी नमुन्यांचे सत्य बाहेर निघेल. दूषित पाण्यातून अनेक प्रकारचे जलजन्य आजार होत असून पाणी नमुन्यांची तपासणी केव्हा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
शहरात शेकडो हॉटेल आहेत. पण काही हॉटेलमध्ये आरो लावलेले नाहीत. अन्न व प्रशासन विभागाच्यावतीने नेहमीत पाणी नमुने घेण्यात येत नाही. पावसाळ्यात दूषित पाणी पिल्याने कावीळ, कॉलेरा, टायफाईड, अतिसार व इतर आजार होण्याची शक्यता बळावते. जिल्हाभरातून जुलै महिन्यात १२७० पाणी नमुने तपासणासाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत आले होते. यापैकी १५२ नमुन्यांमध्ये कॉलोफार्म बॅक्टरीयाचे प्रमाण आढळून आले होते. हा जिवाणू जलजन्य आजार होण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे हॉटेल चहाच्या कँटीनसमध्येही पाणी बाहेरून आणण्यात येते. या ठिकाणी योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे हे पाणी ग्राहकांच्या पिण्यात आल्याने यातून जलजन्य आजार होऊ शकतात. त्यामुळे पाणी नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवावे व सदर नमुने सदोष आढळल्यास त्या हॉटेलचालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. हॉटेल चालकाला जेव्हा महापालिकेकडून किंवा एफडीए विभागाकडून परवाना मिळतो, त्या परवान्यातच हॉटेल चालकांनी पाणी नमुन्यांची तपासणी करून घ्यावी व सदर पाणी पिण्यायोग्य असल्याचे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून तसे प्रमाणपत्र मिळवून घ्यावे, अशी तरतूद आहे. पण अनेक हॉटेलचालक प्रत्येक वस्तुंचे दामदुप्पट दर घेतात. मात्र नागरिकांना पाहिजे तशा सुविधा मात्र पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना याठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे व दूषित पाण्यामुळे आजार मोफत मिळतात. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकाºयांनी पाणी नमुने तपासणीची विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
जलजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता
ज्या पिण्याच्या पाण्यात कॉलिफार्म बॅक्टेरीया पॉझिटिव्ह आढळतो, ते पाणी नमुने दूषित मानले जातात. अनेक हॉटेल्समध्ये पिण्याच्या पाण्यासंदर्भात कुठलीही काळजी घेतली जात नाही. पिण्याच्या पाण्याचे ग्लास अस्वच्छ जागेवर ठेवले जातात. हॉटेल्समध्ये बोरवलचे किंवा विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे या पाण्यात जर कॉलिफार्म बॅक्टेरीया असेल तर जलजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेनेसुद्धा पाणी नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले पाहिजे, अशी मागणी काही जागरुक नागरिकांनी केली आहे.

Web Title: When to check the water samples in the hotel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.