अतिक्रमणातून मोकळा श्वास कधी ?

By Admin | Updated: December 28, 2016 01:45 IST2016-12-28T01:45:29+5:302016-12-28T01:45:29+5:30

राजकमल, जयस्तंभ, गांधी, सरोज, चित्रा, इतवारा येथील उद्योग वर्गाच्या इमारती अतिक्रमणमुक्त झाल्या आहेत.

When is the breathing of an encroachment? | अतिक्रमणातून मोकळा श्वास कधी ?

अतिक्रमणातून मोकळा श्वास कधी ?

दुकानासमोरील जागा भाड्याने : अनेकांना धनलाभ, महापालिकेसह वाहतूक शाखेचे दुर्लक्ष
अमरावती : राजकमल, जयस्तंभ, गांधी, सरोज, चित्रा, इतवारा येथील उद्योग वर्गाच्या इमारती अतिक्रमणमुक्त झाल्या आहेत. अनेक बड्या प्रतिष्ठानधारकांनी स्वमालकीचा दुकानासमोरील जागा चक्क भाड्याने दिल्या असून अनेकांना यातून धनलाभ होत आहे. या अतिक्रमणाकडे महापालिकेसह शहर वाहतूक शाखेने दुर्लक्ष चालविले आहे.
आज एकीकडे मध्यवस्तीतील हा परिसर विकसित म्हणून ओळखल्या जातो. तरी या प्रभागात वाढते अतिक्रमण ही समस्या दिवसागणिक गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे परिसराची अवस्था वाईट होत चालली आहे. शहराचे मुख्य बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या या भागात भरमसाठ व्यावसायिक संकुले उभी राहली, तथापि पार्किंगची सुविधा न ठेवल्याने वाहनांच्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
राजकमल, चित्रा, सरोज, अंबादेवी रोड, बडनेरा रस्ता, राजापेठ, नमुना या भागात अनधिकृत पार्किंग समस्या वाढत चालली आहे. वाढत्या अतिक्रमणाने रस्ते अरुंद बनलेत. सरोज चौकातून जवाहर गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची भलीमोठी पार्किंग लागत असल्याने या रस्त्याने पादचाऱ्याने चालावे तरी कसे? असे चित्र आहे.
या परिसरात सध्या अनेक नवे बांधकाम सुरु असून पार्किंगसाठी मात्र जागाच सोडली नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाने त्याची दखल घेणे गरजेचे आहे. पण पालिका या प्रश्नाकडे लक्ष देतान दिसत नाही.
शहराची या हृदयस्थानी वाहनांच्या संख्येसोबतच अनधिकृ पार्किंग आणि फेरीवाल्यांची संख्याही वाढली आहे. या प्रभागात मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे काम झाल्याने इमारतीही वाढल्या. मात्र रस्त्यावरच पार्किंग होत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसतो. (प्रतिनिधी)

रघुवीरमुळे वाहतूक कोंडी
श्याम चौकातील रघुवीरसमोर चारचाकी वाहनांची भलीमोठी पार्किंग लागत असल्याने या मार्गावर रोज दुपारी - संध्याकाळी ‘जाम’ लागतो. रघुवीरची पार्किंग व्यवस्था टॉकीजच्या आता असताना बिनबोभाटपणे रस्त्यावर वाहने लावण्याच्या सूचना रघुवीरकडून केल्या जातात. पालिका प्रशासन मात्र रघुवीरबाबत मौन धारण करून आहे.


हॉटेल्सचे पार्किंग बेपत्ता
राजकमल चौकात नव्याने दोन हॉटेल्स लागली आहेत. मात्र या दोन्ही हॉटेल्सकडे पार्किंग व्यवस्थाही ग्राहकांसह तेथील मालक, कर्मचाऱ्यांच्या वाहने भररस्त्यावर उभी केली जातात. मात्र या हॉटेलधारकांना नोटीस बजावण्याचे सौजन्य पालिकेला दाखविता आलेली नाही.

 

Web Title: When is the breathing of an encroachment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.