सैराट युवकांच्या भन्नाट दुचाकींना 'ब्रेक' केंव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2016 00:05 IST2016-08-15T00:05:30+5:302016-08-15T00:05:30+5:30

महाविद्यालयीन विद्यार्थी व अल्पवयीन मुलांच्या भन्नाट दुचाकीमुळे दररोज अपघात घडून अनेक जण जखमी होत आहेत.

When the 'break' of saraut youths 'different bikes'? | सैराट युवकांच्या भन्नाट दुचाकींना 'ब्रेक' केंव्हा ?

सैराट युवकांच्या भन्नाट दुचाकींना 'ब्रेक' केंव्हा ?

दररोज किरकोळ अपघात : दसरा मैदान, साईनगर रोडवर अनेक घटना 
अमरावती : महाविद्यालयीन विद्यार्थी व अल्पवयीन मुलांच्या भन्नाट दुचाकीमुळे दररोज अपघात घडून अनेक जण जखमी होत आहेत. या मनमानी कारभारामुळे दसरा मैदान ते साईनगर मार्गाने जाणाऱ्या वाहन चालकांचा जीव टांगणीवर आहे.
भुतेश्वर ते साईनगरपर्यंतच्या मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थी व अल्पवयीन मुले भरधाव दुचाकी चालवित असल्याचे दररोज निदर्शनास येत आहे. स्टंटबाजी करणारे दुचाकीस्वार अन्य दुचाकीला कट मारून पुढे निघून जातात. मात्र, या यामुळे अपघात घडून तो दुचाकीस्वार खाली कोसळून जखमी होत आहे. मात्र, हे सैराट युवक भरधाव वेगाने पुढे निघून जातात. या अपघातात जखमी नागरिकांना उचलून स्थानिक रहिवासी त्यांच्या जखमावर प्राथमिक उपचार करतात. असे किरकोळ अपघात दररोज घडत असले तरी एखादवेळी दुचाकीचालकाला जीव गमावावा लागू शकतो, याची पुसटशी कल्पनाही या भन्नाट युवकांना नसते. या मार्गाने पोलिसांसह सीआरओ वाहनांची गस्त अधूनमधून सुरूच असते. मात्र, तरीसुध्दा पोलिसांच्या दृष्टीस हे वेगाने जाणारे युवक का पडत नाहीत, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. किरकोळ अपघात घडल्यास वाहनचालक जवळच्याच एखाद्या दवाखान्यात उपचार करून घेतात. परंतु त्याची तक्रार पोलिसांपर्यंत येत नाही.मोठा अपघात झाल्यास त्याची नोंद पोलीस ठाण्यात होते. परंतु या अपघातात कुणी जायबंदी झाल्यास प्रकरणाला कधीकधी वेगळे वळण लागते. अशा सैराट दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप न केल्यास नागरिकच कायदा हातात घेऊन दुचाकीस्वारांना चोप देऊ शकतात. याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

दाम्पत्यासह चिमुकला बचावला
दोन दिवसांपूर्वी साईनगरकडून राजापेठकडे दुचाकीने जाणाऱ्या एका दाम्पत्याच्या गाडीला नवाथेनगर चौकात अज्ञात दुचाकीस्वाराने कट मारला. दाम्पत्यासह दोन महिन्याचा चिमुकलाही कोसळला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली.सुदैवाने मोठा अपघात टळला. अनर्थ घडला असता तर जबाबदारी कुणाची? अशी चर्चा परिसरात होती.

अधिसूचनेनंतरही शहरात जड वाहतूक सुरुच
पोलीस विभागाने अधिसूचना काढून जड वाहतुकीस बंदी केली आहे. जिवनाश्वक वस्तुंच्या वाहतुकीसाठी वेळेची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, तरी सुद्धा छुप्या मार्गाने शहरात जड वाहतूक सुरुच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या जड वाहतुकीमुळे मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यावर तातडीची उपायययोजना गरजेची असल्याचे चित्र आहे.

भरधाव दुचाकी चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी ड्राईव्ह घेण्यात येईल. वाहतूक पोलीस तैनात करून दुचाकीस्वारांवर लक्ष ठेवून कारवाई करू.
-पी.डी.डोंगरदिवे,
सहायक पोलीस आयुक्त.

Web Title: When the 'break' of saraut youths 'different bikes'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.