ओव्हरलोड ट्रकवर कारवाई केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:11 IST2018-04-05T00:11:28+5:302018-04-05T00:11:28+5:30
तालुक्यातील सुरू असलेल्या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू आहे. ओव्हरलोड ट्रकमध्ये मुरूम, गिट्टी, तसेच पिवळी माती भरून सर्रास वाहतूक केली जात आहे.

ओव्हरलोड ट्रकवर कारवाई केव्हा?
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यातील सुरू असलेल्या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू आहे. ओव्हरलोड ट्रकमध्ये मुरूम, गिट्टी, तसेच पिवळी माती भरून सर्रास वाहतूक केली जात आहे. एरवी ओव्हरलोडच्या नावाखाली इतर वाहनांवर कारवाही करणारे संबंधित अधिकारी याप्रकरणी गप्प का, असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे विकासकाम सुरू आहे. त्यात राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचा कंत्राट एच.जी. इन्फ्रा कंपनीने घेतला आहे. या महामार्गाच्या बांधकामात ई-क्लास जमिनीवरील पिवळ्या मातीचा उत्खनन करून वापर केला जात आहे. यासाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये नियमबाह्य विनापरवाना गौण खनिजांची ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे.
या वाहनांमध्ये प्रत्येकी ५ ब्रास गौण खनिज वाहतुकीची परवानगी आहे. परंतु कंत्राटदार एका वाहनांमध्ये ६ ब्रासच्यावर गौण खनिजांची वाहतूक करीत आहे. अशा ओव्हरलोड वाहनाच्या दररोज शेकडो फेºया कंत्राटदाराकडून केल्या जात आहे. यामुळे गौण खनिजांचा शासनाला मिळणारा लाखोंचा महसूल बुडविला जात आहे. याचा फटका महसूल विभाग का सहन करत आहे, हे न सुटणारे कोडेच आहे. गौण खनिजांची वाहतूक करीत असताना मागून येणाºया वाहनाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे नियम आहे. त्यासाठी वाहनाला वरून प्लास्टिक कापडाने झाकणे अनिवार्य असताना नियमाची पायमल्ली संबंधित कंत्राटदाराकडून होत आहे. गौन खनिजातून महसूल प्राप्तीसाठी कारवाही करणारा महसूल विभाग तसेच ओव्हरलोडच्या नावाखाली उठसुठ कारवाई करणारा पोलीस विभाग या कंत्राटदारांच्या वाहनांवर कारवाही करण्याचे धाडस का दाखवित नाही, असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे.